आठवडे बाजार झाला सुना सुना

By admin | Published: November 11, 2016 11:00 PM2016-11-11T23:00:26+5:302016-11-11T23:03:31+5:30

आठवडे बाजार झाला सुना सुना

Hearing the heard heard the market of the week | आठवडे बाजार झाला सुना सुना

आठवडे बाजार झाला सुना सुना

Next

सुरगाणा : ग्रामीण भागातील नागरिकांची कोंडी सुरगाणा : शुक्रवारी येथील आठवडे बाजार असल्याने तालुका परिसरातून आलेल्या नागरिकांची ५०० व १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी येथील पोस्ट कार्यालय तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मोठी गर्दी झाली होती.
बाजारात विविध व्यावसायिकांची आणि ग्राहकांचीही गर्दी जवळ मोठ्या नोटा आहेत; पण सुटे मिळत नसल्याने साधी भाजी खरेदी करणेही ग्राहकांना कठीण होऊन बसले आहे. हीच परिस्थिती बहुतांश व्यावसायिकांचीदेखील निर्माण झाली होती. किराणा किंवा इतर व्यापारी मोठ्या नोटा घेत असल्याने घाऊक खरेदी करताना ग्राहकांची फारशी अडचण झाली नाही. मात्र खरी आर्थिक अडचण झाली ती छोटे विके्रते आणि किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांची. काहींना केसपेपर काढण्यासाठी, कोणाला गावाला जाण्यासाठी अशा विविध बाबीकरिता सुटे पैसे मिळत नसल्याने आणि नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत प्रचंड गर्दीमुळे नंबर लागत नसल्याने असंख्य नागरिकांची आर्थिक कोंडी झाली.
कुणाला दुसऱ्याकडून रक्कम घ्यायची आहे; पण नवीन नोटा येईपर्यंत घेणेकऱ्याला वाट पहावी लागणार आहे, तर देणेकरी मात्र काहीसा सुखावला आहे. पोस्टातही मोठी गर्दी झाली होती. मात्र येथे शंभरच्या नोटा दुपारपर्यंत संपल्या होत्या. त्यामुळे अनेकांना माघारी फिरावे लागले. येथील देना बँक आणि महाराष्ट्र बँकेतही नोटा बदलून घेण्यासाठी व खात्यावर रक्कम भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
एका विद्यार्थिनीला नाशिकला जायचे होते. मात्र जवळ सुटे पैसे नव्हते. निदान पाचशेचे सुटे मिळाले तरी तिच्यासाठी ते अनमोल होते. पण कुठूनही सुटे मिळत नव्हते. शेवटी ती महाराष्ट्र बँकेत गेली. तर तिथे तोबा गर्दी. नाशिक जाणे रहीत करण्याची वेळ आली. अखेर त्याचवेळी तिला एका परिचिताकडून शंभरच्या चार आणि दहाच्या दहा नोटा असे केवळ पाचशेचे सुटे मिळताच तिच्या चेहऱ्यावर हसू आले आणि ती नाशिकला रवाना झाली. यासारख्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)

Web Title: Hearing the heard heard the market of the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.