ह्दयद्रावक : ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचे शीर झाले धडावेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 08:34 PM2021-01-17T20:34:11+5:302021-01-17T20:35:56+5:30

नानेगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक सुरु असते; मात्र याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Heartbreaker: A young man lost his head in a tractor-two-wheeler accident | ह्दयद्रावक : ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचे शीर झाले धडावेगळे

ह्दयद्रावक : ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचे शीर झाले धडावेगळे

Next
ठळक मुद्देट्रॅक्टर ट्रॉलीचा बसला जोरदार फटकागौणखनिजाची अवैध वाहतुक नागरिकांच्या जीवावर बेतू लागली अपघातग्रस्त ट्रॅक्टर-ट्रॉली, दुचाकी पोलीस ठाण्यात जमा

नाशिक : नानेगाव साखर कारखाना रस्त्यावर ट्रॅक्टर-दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालकाचे शीर थेट धडावेगळे झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात नवनाथ बन्सी पवार (३०, रा. वऱ्हे दारणा, ता.निफाड) हे मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेने संपुर्ण शहरासह निफाड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. गौणखनिजाची अवैध वाहतुक नागरिकांच्या जीवावर बेतू लागली असल्याची परिसरात चर्चा आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नानेगाव साखर कारखान्याच्या रस्त्यावरुन पवार हे त्यांच्या दुचाकीने (एम.एच१५ बीटी९५०३) भरधाव जात होते. यावेळी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सावरकरनगर या लोकवस्तीजवळ नानेगावकडून दगड-माती घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरच्या (एम.एच१५ डीयू ४५९४) ट्रॉलीला त्यांची दुचाकी येऊन धडकली. या अपघातात पवार यांच्या डोक्याला ट्रॉलीचा जोरदार फटका बसला आणि त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले. या अपघातप्रकरणी ट्रॅक्टरचालक विकास दगु सानप याने दिलेल्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला

नानेगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक सुरु असते; मात्र याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दिवसरात्र होणारी गौणखनिजाची बेकायदेशीर वाहतूकीची माहिती महसूल प्रशासनाला असूनही या मार्गावर आजपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल होत नाही पण शनिवारी झालेल्या अपघाताने नानेगावहून आपल्यागावी परतणाऱ्या तीस वर्षीय युवकाला प्राण गमवावा लागला. ट्रॅक्टरमध्ये मुरूमाची जीवघेणी वाहतूक प्रशासनाच्या मेहेरनजरमुळे सुरु असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. ट्रक्टर व दुचाकीमध्ये झालेला अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार पवार यांचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला. यावेळी मदतीसाठी धावुन आलेले प्रत्यक्षदर्शींच्याही अंगावर शहारे उभे राहिले. याप्रकरणी पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर-ट्रॉली, दुचाकी पोलीस ठाण्यात जमा केली आहे. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करीत आहेत.

Web Title: Heartbreaker: A young man lost his head in a tractor-two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.