टाकेदेवगांव परिसरातील ५० ते ६० लोकवस्ती असलेल्या गाळवाडीत गेल्या चाळीस वर्षांपूर्वी बांधकाम केलेला समाजवट्टा होता. लोकसहकार्यातून ऊन, वारा, पावसाच्या बचावासाठी नागरिकांनी समाजवट्ट्यावर हजार ते पंधराशे कौलांची व्यवस्था करून छप्पर टाकले होते. मात्र, टाकेदेवगांव परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे समाजमंदिराचे छप्पर पडून मोठे नुकसान झाले आहे. देवगांवसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होऊन परिसर जलमय झाला आहे. वारा-वादळ व मुसळधार पाऊस यामुळे गाळवाडी येथील समाजमंदिराची पडझड होऊन कौलांचे नुकसान झाले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी वाक यांनी टाकेदेवगांव ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांस सदर घटनेचा तपशील कळविला असून, पडझड झालेल्या समाजमंदिराचा पंचनामा करावा, अशी मागणी शिवाजी वाक यांनी केली.
------------
मुसळधार पावसाने गाळवाडी येथे कोसळलेले समाजमंदिर. (२२ देवगांव ३)
-----------------
प्राथमिक शाळेच्या शौचालयाची भिंत पडली
देवगांव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शौचालयाची भिंत मुसळधार पावसाच्या तीव्रतेने पडली. रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून, सकाळी शौचालयाची भिंत पडली. सुदैवाने शाळा सुरू नसल्यामुळे जीवितहानी टळली. पावसाचे पाणी शौचालयाच्या भिंतीत झिरपून वादळ-वाऱ्याच्या तडाख्याने कोसळली.
(२२ देवगाव ४)
220721\screenshot_20210722-124351_whatsapp.jpg~220721\22nsk_14_22072021_13.jpg
फोटो कॅप्शन :
१) देवगांव येथे विद्युतवाहक खांब कोसळून विद्युत पुरवठा खंडित.
२) देवगांव - श्रीघाट - सावरपाडा मार्गावर दरड कोसळली.
३) मुसळधार पावसाने गाळवाडी येथे कोसळलेले समाजमंदिर.
४) प्राथमिक शाळेच्या सौचालयाची भिंत पडली.
५) मोखाडा तालुक्यातील देवबांध- आडोशी रस्ता पाण्याखाली गेला.~२२ देवगाव ३/४