मुखेड परिसरात जोरदार पावसाने आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 07:15 PM2019-06-24T19:15:30+5:302019-06-24T19:15:44+5:30
मुखेड : पाणीच पाणी चोहीकडे अशी अवस्था करून कालच्या पावसाने मुखेड परिसरात झाली. गतवेळी २३ जुलैला पेरण्या झाल्यानंतर पाऊस जो गायब झाला तो अद्यापही तो परतला नव्हता. त्यातच यावेळीही जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी वर्ग ही हादरून गेला होता. याशिवाय माणसाच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचेही गंभीर रूप धारण केले होते. त्यामुळे सारेच पावसाची प्रतीक्षा करत करीत होते.

शेवटी रविवारी (दि.२३) रात्री साडेदहा वाजता विजांचा कडकडात पावसाचे आगमन झाले. आणि अवघ्या दीड तासात जोरदार बरसला. त्यामुळे शेतशिवार पाण्याने भरले.
या पावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांच्या पेरण्या पुरेशा वापसा होणार आहे. या पुढेही पावसाने उर्वरीत पावसाळ्यात वेळोवेळी असेच बरसत राहिल्या शेतकऱ्यांच्या गेल्या तीन वर्षात पासूनचा दुष्काळ मोङुन त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, अशी प्रतिक्रि या येथील शेतकरी, माजी सरपंच संजय पगार यांचेसह काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.