पंचवटीत जोरदार पावसाने परिसर जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:35 AM2021-01-13T04:35:08+5:302021-01-13T04:35:08+5:30
मागील दोन-तीन दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता त्यातच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती ...
मागील दोन-तीन दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता त्यातच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
अवकाळी पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती त्यातच शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस पडण्याची चिन्हे दिसून येत होते दुपारी चार वाजेच्या सुमारास सुरुवातीला रिमझिम आणि त्यानंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ झाल्याचे चित्र दिसून आले. पंचवटीत असलेल्या मोकळ्या पटांगण व खोलमय रस्त्यावर विशेषतः गावठाण भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले असल्याचे बघायला मिळाले दुपारच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने रस्ते जलमय झाले होते तर पावणे पाच वाजेला पावसाचा जोर काहीसा ओसरला त्यानंतर आकाश मोकळे झाल्याने नागरिकांना ऊन पावसाचा खेळ बघायला मिळाला. शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसामुळे परिसरातील रस्ते काही काळ ओस पडल्याचे दिसून आले.