अति पावसाने पिकांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 03:05 PM2019-10-25T15:05:15+5:302019-10-25T15:05:27+5:30
खेडलेझुंगे : जिल्ह्यात अतिपावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे सडलेल्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे.
खेडलेझुंगे : जिल्ह्यात अतिपावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे सडलेल्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असतांना नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे करायला यंत्रणाच उपलब्ध नव्हती त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
खेडलेझुंगे, रूई, कोळगांव, सारोळे थडी, धारणगांव विर व खडक परिसरात दोन वर्षापासुन शेतीतून पुरेसे उत्पादन नसल्याने मुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयणीय झालेली आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला हा भाग दुष्काळाने होरपळत होता. जुलै आॅगस्ट महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. आज परतीचा पाऊस जोरात होत असल्याने शेतात पाणी साचून राहिल्याने कांद्याची रोप, टोमॅटो, मका, बाजरी, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नाले, ओढे, पाट, चाºया वाहत आहेत. त्यामुळे त्यातील जास्तीचे पाणी ही नाले, चाºया, ओढे संबंधित यंत्रणेकडून साफसफाई न झाल्याने त्यातील पाणी शेतातुन वाहत असल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे. यावर्षी पाऊस उशिरा आल्याने आणि भर जोमात पीक असतांना पाण्याचा खंड पडल्याने पिकांचे उत्पादन घटले आहे.
कर्जाचा डोंगर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशातच परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. नुकसान झाल्याने शेतकºयांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. परंतु ़निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु होती. निवडणूक पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतलेली असल्याने पिकांचे सर्वेक्षण, पंचनामे करणार कोण असा प्रश्न शेतकर्यांना पडला होता. निवडणुकीच्या कामामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. शासनाने दिपावलीच्या सुट्टीमध्ये शासकीय यंत्रणेला नुकसान ग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देवुन लवकरात लवकर पंचनामे करु न मदत मिळवुन द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.