मालेगाव : तालुक्यातील मुंगसे येथील शंभूनारायण प्रतिष्ठानतर्फे महाड व चिपळूण येथील पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
महाड व चिपळूण परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना मदतीची गरज आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत शंभूनारायण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी मुंगसे मार्केट व तालुक्यातून मदत जमा केली होती. जीवनावश्यक वस्तूंची मदत चिपळूण येथील रहिवाशांपर्यंत पोहोचविण्यात आली.यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुनील शेवाळे, उपाध्यक्ष प्रेम वाळके, सतीश पवार, हरिष पानपाटील, सुभाष सोनवणे, नितीन मांडवडे, संदीप शेवाळे, अजय पवार, गणेश शेवाळे, मयूर छाजेड, स्वप्नील पवार, तुषार सूर्यवंशी, सुफियान शेख, अमोल सूर्यवंशी, मयूर निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.चिपळूण परिसरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना शंभूनारायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील शेवाळे, प्रेम वाळके, सतीश पवार, हरिष पानपाटील आदी.