इतिहासाचा वारसा जरीमरी

By admin | Published: September 30, 2014 11:38 PM2014-09-30T23:38:06+5:302014-09-30T23:38:06+5:30

शिवाजी चौक ते महंमद अली चौक मार्गावर मार्केटसमोर नाल्याशेजारी जरीमरी देवस्थान मराठय़ांच्या शौर्यशाली इतिहासाची साक्ष देत आजही अभिमानाने उभे आहे.

History | इतिहासाचा वारसा जरीमरी

इतिहासाचा वारसा जरीमरी

Next
>विनायक बेटावदकर ल्ल कल्याण
कल्याण : शिवाजी चौक ते महंमद अली चौक मार्गावर मार्केटसमोर  नाल्याशेजारी जरीमरी देवस्थान मराठय़ांच्या शौर्यशाली इतिहासाची साक्ष देत आजही अभिमानाने उभे आहे.
पूर्वी हे मंदिर दगडी चौथ:यावर लाकडी खांबांच्या आधारावर कौलारू स्वरूपाचे होते. मंदिरापुढे सुंदर पटांगण होते. मंदिराचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार झाला. मैदानात गृहसंकुले उभी राहिली. त्यात मंदिराचे जुने सौंदर्य लुप्त झाले.
मंदिर किती जुने आहे, हे नेमके सांगता येत नाही. पण, शिवाजी चौकातील हनुमान मंदिराची पूर्वीची बांधणी व जरीमरी मंदिराची बांधणी एकाच पद्धतीची होती. त्यावरून दोन्ही मंदिरांचा काळ  एकच असावा, असा अंदाज आहे. पण, काही इतिहास अभ्यासकांच्या मते हे मंदिर त्याहून जुने असावे. पूर्वीच्या ग्रामस्थांनी हे मंदिर बांधले असल्याचे सांगितले जाते. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याप्रमाणोच या मंदिराला इतिहासाचा वारसा लाभला आहे. धर्मवीर सरदार अणजूरकर यांनी पोर्तुगीजांना घालवून दिले. त्यासाठी वसईच्या किल्ल्यावर स्वारी करून तो ताब्यात घेण्यासाठी सरदार चिमाजी आप्पांना मोहिमेवर पाठविले. चिमाजी आप्पांनी कल्याणात येऊन याच जरीमरी देवळाच्या पटांगणात गोंधळ घालून देवीचा कौल घेतला. त्याच वेळी वसईच्या मोहिमेचीही व्यूहरचना याच गोंधळाच्या निमित्ताने येथे झाल्याचे नमूद आहे. या मंदिराला स्वातंत्र्य आंदोलनाची पाश्र्वभूमीही आहे. 
 
साने गुरुजी आणि सेनापती बापट यांचा सहवास
4स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग तुकाराम पाटील यांचे विद्युत उपकरणाचे येथे दुकान होते. गुलाबसिंग परदेशी यांची पिठाची व भाताची गिरणी होती. हे दोघेही आंदोलनाशी संबंधित असल्याने साने गुरुजी, सेनापती बापट हे तेथे येत. देवळात त्यांच्या गप्पा होत, असे सांगतात. या पाश्र्वभूमीवर या मंदिरातील घटस्थापनेला एक वेगळे महत्त्व दिले जात असे. अलीकडच्या काळात घट बसतात. होम, याग कीर्तन, आरती या कार्यक्रमांबरोबरच गरबाही रंगतो. ग्रामीण भागातून भाजी विकण्यासाठी मार्केटमध्ये येणा:या भाविकांची नवरात्नात मोठी गर्दी असते.
 
नमो देवी 
महादेवी
शिवाय 
सततं नम:
 
कल्याणमधील ऐतिहासिक मंदिरातील जरीमरी मातेची ही मूर्ती नवरात्रत लाखो भाविक तिच्या दर्शनासाठी येतात. याच वेळी मोठी यात्रही भरते.

Web Title: History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.