घरकुल कामात कळवणला पुन्हा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:58 PM2019-11-21T18:58:18+5:302019-11-21T19:00:08+5:30
कळवण : प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत २०१६ ते २०१९ मध्ये झालेल्या उत्कृष्ट कामाबद्दल नाशिक जिल्हा परिषद सह नाशिक विभागातील पहिल्या तीन क्र मांकातील तालुका म्हणून कळवण पंचायत समितीला राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते विशेष तीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कळवण : प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत २०१६ ते २०१९ मध्ये झालेल्या उत्कृष्ट कामाबद्दल नाशिक जिल्हा परिषद सह नाशिक विभागातील पहिल्या तीन क्र मांकातील तालुका म्हणून कळवण पंचायत समितीला राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते विशेष तीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत एकूण कळवण, सुरगाणा, पेठ व इगतपुरी तालुके मिळून एकूण २२ प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. यात कळवण तालुक्यातील गेल्या ३ वर्षातील कामगिरीचा सिंहाचा वाटा असल्याची माहिती गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांनी दिली.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आवास दिनानिमित्त झालेल्या कार्यक्र मात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. व उपयुक्त अरविंद मोरे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परेदशी, कळवण गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम तसेच सुरगाणा पेठ व इगतपुरी आदी गटविकास अधिकारी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अशी आहे कळवणची कामिगरी ङ्क्त
कळवण गटात गेल्या दोन तीन वर्षात घरकुल कामात समाधान कारक कामगिरी झाल्याने पुढील कामानिमित्त राज्यपाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
कळवण गटात सन २०१६ ते २०१९ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ९९ टक्के उद्दिष्ट पुर्ण.
नाशिक विभागाअंतर्गत पहिल्या तीन तालुक्यात कळवण ८६.१ टक्केवारीने दुसऱ्या क्र मांकावर असून नाशिक जिल्ह्यात पहिल्या क्र मांकावर आहे.
ग्रामीण भागाची सर्वंकष प्रभावी अंमलबजावणी करून बँक खाते, आधार लिंक आदी कामात राज्यात कळवण तिसºया ( ९९.१८ टक्के ) क्र मांकावर आहे.