उत्कंठा, बंदोबस्त अन् निकालाचा सन्मान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 01:41 AM2019-11-10T01:41:00+5:302019-11-10T01:41:24+5:30
अयोध्या निकालप्रकरणी शहर व परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. संवेदनशील भागातील चौकाचौकात राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसेच धार्मिक प्रार्थनास्थळांभोवतीही पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाचा संमजसपणे सन्मान नागरीकांनी राखला. शहरासह जिल्ह्याच्या कायदासुव्यवथेला तडा देणारा कुठलाही अनुचित प्रकार शनिवारी (दि.९) दिवसभरात घडला नाही.
नाशिक : अयोध्या निकालप्रकरणी शहर व परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. संवेदनशील भागातील चौकाचौकात राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसेच धार्मिक प्रार्थनास्थळांभोवतीही पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाचा संमजसपणे सन्मान नागरीकांनी राखला. शहरासह जिल्ह्याच्या कायदासुव्यवथेला तडा देणारा कुठलाही अनुचित प्रकार शनिवारी (दि.९) दिवसभरात घडला नाही.
शनिवारी (दि.९) सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी निकाल दिल्यानंतर सर्वच घटकांनी निकालाचा आदर राखला. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शांततापूर्ण वातावरण कायम राहिले. जुने नाशिक, वडाळागाव तसेच मालेगाव शहरातही शांततेत समाजबांधवांनी निकालाचे स्वागत केले. सर्व धर्मगुरू, शांतता समिती सदस्य व सुजाण नाशिककरांनी राष्टÑीय एकात्मता जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच अधीक्षक डॉ. आरती सिंह हे स्वत: पोलीस प्रशासनप्रमुख म्हणून रस्त्यावर उतरले होते. बंदोबस्तावर शहरासह जिल्ह्यात त्यांनी ‘वॉच’ ठेवत वेळोवेळी आढावा घेतला. रविवारी जुने नाशिकसह वडाळागाव, नाशिकरोड, मालेगावमध्येही ईद-ए-मिलादचा सण उत्साहात साजरा होत असून मिरवणुका काढण्यात येणार आहे. मिरवणुकांमध्ये कोणतेही मंडळ डिजेसह सहभागी होणार नसल्याने पोलिसांचा ताण हलका झाला. विशेष म्हणजे नागरिकांनीही व्हॉटसप अप सारख्या सोशल मिडियावर आवास्तव आणि प्रक्षोभक पोस्ट टाकणे टाळले.
नागरिकांशी साधला संवाद...
नांगरे पाटील, आरती सिंह यांनी बंदोबस्तादरम्यान चौकाचौकात जाऊन शांतता समिती, मोहल्ला समिती सदस्यांशी तसेच अन्य नागरिकांशी संवाद साधला. क ोठेही समाजकं टकांकडून कुठल्याहीप्रकारे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न तर होत नाही ना याचा आढावा जाणून घेत मार्गदर्शन केले. शहर व ग्रामीणमध्ये सुमारे २००पोलीस अधिकारी, ४हजार ५००कर्मचारी, शेकडो होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात आहे.