मुसळगावला नवोदय विदयालय गुणवंतांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:45 PM2020-06-25T16:45:53+5:302020-06-25T16:50:18+5:30

सिन्नर : ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत कुठेही कमी नाही हे मुसळगांव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिल्याचे गौरवोद्गार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम शिंदे यांनी काढले. शाळा स्थापनेच्या इतिहासात प्रथमच येथील तीन मुली धनश्री रविंद्र शिंदे , प्रज्ञा संजय जाधव व तेजश्री लक्ष्मण खैराड या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशास पात्र ठरल्या. या विद्यार्थिनींचा सत्कार करताना ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक वसंत गोसावी, भास्कर ठाकरे व पालक उपस्थित होते.

Honor of Navodaya Vidyalaya meritorious to Musalgaon | मुसळगावला नवोदय विदयालय गुणवंतांचा सन्मान

मुसळगावला नवोदय विदयालय गुणवंतांचा सन्मान

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत . यातच भर

सिन्नर : ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत कुठेही कमी नाही हे मुसळगांव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिल्याचे गौरवोद्गार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम शिंदे यांनी काढले. शाळा स्थापनेच्या इतिहासात प्रथमच येथील तीन मुली धनश्री रविंद्र शिंदे , प्रज्ञा संजय जाधव व तेजश्री लक्ष्मण खैराड या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशास पात्र ठरल्या. या विद्यार्थिनींचा सत्कार करताना ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक वसंत गोसावी, भास्कर ठाकरे व पालक उपस्थित होते.
मुसळगांव शाळेचे विद्यार्थी विविध उपक्रमातच नव्हे तर गुणवत्तेत देखील नेहमीच पुढे असतात आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत . यातच भर म्हणून आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांकडून. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात शाळेतील विद्यार्थिनी धनश्री रविंद्र शिंदे (36 वी), प्रज्ञा संजय जाधव(49 वी) व तेजश्री लक्ष्मण खैराड (80वी) आली. यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. वर्गशिक्षक विकास गुंजाळ यांच्या अथक परिश्रमामुळे व त्यांनी जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना केलेल्या सुयोग्य मार्गदर्शनामुळे शाळेला आज हे यश प्राप्त झाल्याचे मुख्याध्यापक वसंत गोसावी म्हणाले .या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी गुंजाळ यांना स्वाती येवले यांचीही अनमोल साथ लाभली. शाळेच्या या यशाचे गावच्या सरपंच कमलताई जाधव, उपसरपंच रविंद्र शिंदे, गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंखे ,केंद्रप्रमुख हेमंत भुजबळ , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम शिंदे, उपाध्यक्ष अनिल जाधव ,अरुण सिरसाट , मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्याकडून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याकामी शाळेतील शिक्षक अनिता येवले, उषा चव्हाण, जितेंद्र नंदनवार, वैशाली सायाळेकर,पंढरीनाथ मांगते, नवनाथ हांडगे, कल्पना जगताप, श्रावण वाघ, अशोक कासार, रोहिणी राजगुरू, रविंद्र चौरे, स्वाती रोहोकले, विशाखा वर्पे, मोहन सिरसाट, रामहरी भालेराव व स्मिता पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

फोटो

 सिन्नर तालुक्यातील मुसळगांव येथे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपात्र तीन विद्यार्थिनींचा सत्कार करताना अध्यक्ष आत्माराम शिंदे, मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्यासह पालक.

Web Title: Honor of Navodaya Vidyalaya meritorious to Musalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.