पुरंदरे यांचा बालसाहित्यिक पुरस्काराने सन्मान सावाना : दिवेश मेदगेने साधला विद्यार्थ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:17 AM2018-01-13T00:17:04+5:302018-01-13T00:18:06+5:30
नाशिक : कल्पनेतून सुचणाºया साहित्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून उतरणारे साहित्य अधिक सकस आणि परिपूर्ण असते.
नाशिक : कल्पनेतून सुचणाºया साहित्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून उतरणारे साहित्य अधिक सकस आणि परिपूर्ण असते आणि बालसाहित्यात अशा प्रकारची परिपूर्णता असली तरच ती लहान मुलांच्या पसंतीस उतरते. असे बालसाहित्य वरवरून सोपे वाटत असले, तरी सोपे लिहिणे अधिक कठीण असून, असे कठीण लेखनही माधुरी पुरंदरे यांनी अगदी सहजसोप्या शैलीत मांडले असल्यानेच त्यांचे बालसाहित्य विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरणारे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले.
येथील सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात शुक्र वारी (दि. १२) वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ बालसाहित्यिक माधुरी पुरंदरे यांना बालसाहित्यिक पुरस्कार २०१७-१८ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बालसाहित्यिक बाबा भांड, रमेश महाले, बालकलाकार दिवेश मेदगे, प्रा. विलास औरंगाबादकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कार निवडीसाठी उत्कृष्ट परीक्षण नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विनायकदादा पाटील पुढे म्हणाले, मुलांनी काय वाचावे आणि काय वाचू नये हे इतरांकडून सांगितले जाते; परंतु मुलांना काय आवडते हे विचारात घेतले जात नाही. त्यामुळे मुलांची आवडनिवड लक्षात घेऊन या साहित्याची निर्मिती होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शहरातील प्रमुख दहा शाळांमधून सहाशेच्या वर विद्यार्थ्यांनी या उपक्र मात सहभाग नोंदविला. त्यांना बाबा भांड यांचे ‘गोष्ट महाराजाची’, रमेश महाले यांचे ‘अंतराळातील स्टेशन’ आणि माधुरी पुरंदरे यांचे ‘त्या एका दिवशी’ ही पुस्तके वाचनासाठी देण्यात आली होती. ही पुस्तके वाचून मतदानाद्वारे उत्कृष्ट बालसाहित्यिकाची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना भावलेल्या पुस्तकानुसार बालसाहित्यिकास मतदान केले. आणि त्यांना पुस्तक का आवडले, त्यांची लेखनशैली कशी वाटली याबाबतही परीक्षण नोंदविले आहे. यातील सर्वोत्कृष्ट परीक्षण नोंदविणाºया विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. संभाजी महाराजांचे चरित्र आणि कर्तृत्व इतके मोठे आहे क ी, त्यांची भूमिका साकारतानाही अंग पेटून उठते, असे मत बालकलाकार दिवेश मेदगे याने व्यक्त केले. यावेळी त्याने नाशिकमधून बालसाहित्यिक पुरस्काराची निवड करणाºया विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी दिवेशने चित्रीकरणादरम्यान आलेले अनुभव व चित्रीकरणासोबत अभ्यास आणि शालेय वेळापत्रकाची घातलेली सांगड याविषयी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या.