नाशिक : कालिका देवी मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने कालिका देवी मंदिराच्या सभागृहामध्ये कारगिल विजय दिनानिमित्त भारताचे रक्षण करणाऱ्या ३० सैनिकांना आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात आले.या सन्मानितांमध्ये कारगिल युद्धात भारताकडून प्रत्यक्ष लढून पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करणारे लष्कराचे माणिक निकम, शहीद स्क्वार्डन लिडर निनाद मांडवगणेचे वडील अरु ण मांडवगणे, एअरफोर्सचे सुरेश महाडिक, भास्करराव देवरे, सुभाष दुसाने, एस. आर. जोशी , सतीश राजपूत, जगन्नाथ क्षीरसागर, सुरेश आव्हाड, बाळासाहेब जाबराव, बी. के. कमलाकर सावकार, ज्ञानेश्वर गोराडे, सुभाष पाटील, शिरीष मांडे, रवींद्र करंजे, पद्माकर देशपांडे, उद्धव इनामदार, वसंत जगताप आदींचा समावेश होता.या कार्यक्र मासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे क्र ीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, नाशिकचे जिल्हा क्र ीडा अधीकारी रवींद्र नाईक, कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, सुभाष तळाजिया, दत्ता पाटील, अशोक दुधारे, अविनाश टिळे आदींच्या हस्ते सैनिकांना श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना क्र ीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले की, जवानांच्या कर्तबगारीमुळे आपण सुरक्षित आहोत, त्याची जाणीव ठेवून त्यांचा सन्मान करण्याच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्र माचे सूत्रसंचालन अशोक दुधारे यांनी केले, तर जवानांच्या कार्याची माहिती आनंद खरे यांनी दिली.
शहिदांच्या कुटुंबीयांसह सैनिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:13 AM