जिजाऊ जयंतीनिमित्त आशा कर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 07:03 PM2021-01-13T19:03:10+5:302021-01-13T19:03:55+5:30

जळगाव नेऊर : राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कोरोनायोध्दा आशा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Honoring Asha employees on the occasion of Jijau Jayanti | जिजाऊ जयंतीनिमित्त आशा कर्मचाऱ्यांचा सन्मान

चिचोंडी येथील कार्यक्रमात जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करताना उषा शिंदे, सुरेखा दराडे, संगीता नांदुरकर आदी.

Next
ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी देऊन सन्मान

जळगाव नेऊर : राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कोरोनायोध्दा आशा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आशा कर्मचारी मनीषा जाधव, ज्योती चव्हाण, रोहिणी मढवई, अर्चना मढवई, आशा पळे, इंदुबाई जगताप, आशा आहिरराव, वंदना शिंपी, पुरणगाव येथील वत्सला ठोंबरे यांचा प्रदीप शिंदे व मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, बाजार समिती माजी सभापती उषा शिंदे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अधिकारी संगीता नांदुरकर, आदर्श शिक्षीका पुरस्कार मिळाल्याबद्दल मेघा जंगम यांचाही सन्मान प्रा. भाऊसाहेब गमे व अर्जुन कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष बबीता कोल्हे, तालुका संघटक रूपाली जाधव, तालुका उपाध्यक्ष कल्पना महाले, आलिशा शेख, सुनीता पडवळ, सरपंच मनीषा मढवई ,उपसरपंच साईनाथ मढवई, सुधा कोकाटे, मनिषा बोराडे, मराठा सेवा संघाचे विठ्ठल शिंदे, मुख्याध्यापक पंडित मढवई, दाने, प्रदीप जाधव, अंकुश मढवई, नितीन मढवई, गोरख मढवई, वामन पैठणकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली घावटे यांनी तर रूपाली जाधव यांनी आभार मानले.
 

Web Title: Honoring Asha employees on the occasion of Jijau Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.