माध्यमिक विद्यालय उंटवाडीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 09:06 PM2020-08-18T21:06:59+5:302020-08-19T00:51:14+5:30
नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी या शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला, यासर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.
नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी या शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला, यासर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.
अजिंक्य विजय ततार या विद्यार्थ्याने ९६.६० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. शाळेतील अन्य ५८ विद्यार्थ्यांना ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
त्याचप्रमाणे ऋ चा अरु ण माळवाळ (९६.४०),किशोर नंदकिशोर केदार (९६.४०), आशिष दीपक नागमोती (९५.८०), राजवी अनिल हिरे (९५.००), प्रसाद कैलास खोडदे (९५.००), श्रेयस राजेंद्र पगारे (९४.८०), अनुज केशव धामणे (९४.८०) यांनी विशेष यश संपादन केले.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम येण्याचा मान ऋ चा माळवाळ हिला मिळाला. शालेय समिती अध्यक्ष पांडुरंग अकोलकर, मुख्याध्यापक ज्योती कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मनोहर कुलकर्णी, पर्यवेक्षक मोहिनी तुरेकर, राजश्री चंद्रात्रे , शिक्षक प्रतिनिधी दिलीप पवार यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सर्व १० वी चे वर्गशिक्षक व विषय शिक्षक उपस्थित होते. तसेच सर्व १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व दाखल्याचे वाटप करण्यात आले. (फोटो १८ उंटवाडी)