शेतीसाठी घोडे पालन देखील ठरू शकतो पुरक व्यवसाय: रणजित नगरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:19 AM2020-02-16T00:19:18+5:302020-02-16T00:22:56+5:30
नाशिक- अश्व शर्यतीचा क्रिडा प्रकार नाशिकमध्ये रूजला पाहिजे हे खरेच आहे परंतु त्या निमित्ताने शेतकऱ्यांकडे बैलजोडी बरोबर घोडा वाढल्यास घोडे पालनाचा वेगळा पुरक व्यवसाय त्यांना उपलब्ध होऊ शकतो असे मत इन्डिजिनिअस हॉर्स ओनस असोसिएशनचे सरचिटणीस रणजित नगरकर यांनी व्यक्त केले. या संस्थेच्या वतीने अश्वशर्यती घेतल्या जातात.
नाशिक- अश्व शर्यतीचा क्रिडा प्रकार नाशिकमध्ये रूजला पाहिजे हे खरेच आहे परंतु त्या निमित्ताने शेतकऱ्यांकडे बैलजोडी बरोबर घोडा वाढल्यास घोडे पालनाचा वेगळा पुरक व्यवसाय त्यांना उपलब्ध होऊ शकतो असे मत इन्डिजिनिअस हॉर्स ओनस असोसिएशनचे सरचिटणीस रणजित नगरकर यांनी व्यक्त केले. या संस्थेच्या वतीने अश्वशर्यती घेतल्या जातात. रविवारी (दि.१६) नाशिकमध्ये प्रथमच स्पर्धा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न- नाशिकमध्ये स्पर्धा घेण्याचे नियोजन काय?
नगरकर- आमची संस्था राज्य पातळीवर दरवर्षी लोणावळा येथे स्पर्धा घेत असते. यंदा नाशिकची निवड केली आहे. नाशिक हा प्रयोगशील जिल्हा आहे. येथे क्रिडा क्षेत्रात देखील विविध प्रयोग होत असतात. त्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा नाशिकमध्ये घेत आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांना बैल जोडी बरोबरच घोडे देखील असतात त्यांना देखील विषयाचे महत्व कळले पाहिजे. घोड्याच्या चांगल्या जाती असतील तर अगदी कोटी रूपयांपर्यंत देखील भाव मिळतो. त्यामुळे घोडा पालन हा पुरक व्यवसाय ठरू शकतो. तो देखील स्पर्धा आयोजनामागील उद्येश आहे.
प्रश्न- नाशिक मध्ये घोड्यांच्या छंदाबाबत वातावरण कसे काय आहे?
नगरकर- नाशिकमध्य घोडे पाळणे, रपेट करणे असा छंद जोपासणारे अनेक जण आहेत. येवल्याला देखील घोड्याचा बाजार भरतो. घोडयांच्या स्पर्धेबाबत देखील अंत्यत पोषण वातावरण आहे.
प्रश्न- प्रथमच आयोजित केलेल्या स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळाला?
नगरकर- नाशिकमध्ये अर्श्व शर्यत प्रथमच होत असली तरी त्याला मिळालेला प्रतिसाद वादातीत आहे. लोणावळ्याला सत्तर ते पंचाहत्तर स्पर्धक सहभागी होत असतात. नाशिकमध्ये चाळीस स्पर्धक सहभागी आहेत. त्यात तीन स्पर्धक राष्टÑीय पातळीवरील आहेत. तर दहा स्पर्धक नाशिक जिल्ह्यातील आहे. त्यामुळे एकुणच या क्रिडा प्रकाराला नाशिकमध्ये चांगला वाव आहे.
मुलाखत- संजय पाठक