लोहोणेर : सोमवारी दुपारी व सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे येथील वाणी गल्लीत एक घर कासळून मोठ्या प्रमाणात नूकसान झाले.वाणी गल्लीत राहणाऱ्या मीना धामणे या अपंग महिलेचे घर रात्रीच्या वेळी कोसळल्याने घराचे पूर्णत: नुकसान झाले असून यात संसार उपयोगी साहित्य दाबल्याने सुमारे दोन ते सव्वा दोन लाख रु पयांचे नुकसान झाले आहे.सोमवारी (दि.२९) लोहोणेर गावासह परिसरात जोरदार पाऊस झाला. दुपारी, सायंकाळी तसेच रात्री उशिरापर्यंत लोहोणेर गावात दोन वेळा पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे येथील वाणी गल्ली येथे राहणाºया मीना पुंडलिक धामणे या अपंग महिलेच्या घराची भिंत व छत कोसळले त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या संदर्भात लोहोणेर येथील तलाठी अंबादास पुरकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.
जोरदार पावसामुळे येथील घर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 7:11 PM
लोहोणेर : सोमवारी दुपारी व सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे येथील वाणी गल्लीत एक घर कासळून मोठ्या प्रमाणात नूकसान झाले.
ठळक मुद्देलोहोणेर : संसारोपयोगी वस्तू दाबल्याने दोन लाखांचे नुकसान