नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी मानवी साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:06 AM2019-12-30T01:06:14+5:302019-12-30T01:08:11+5:30
नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्यातील सुधारणेचे समर्थन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणच्या सोळा मार्गांवर मानवी साखळी करण्यात आली. आम्ही नागरिकत्व कायद्याचे समर्थन करीत असल्याचे फलक यावेळी झळकविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्यातील सुधारणेचे समर्थन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणच्या सोळा मार्गांवर मानवी साखळी करण्यात आली. आम्ही नागरिकत्व कायद्याचे समर्थन करीत असल्याचे फलक यावेळी झळकविण्यात आले.
केंद्र सरकारने केलेल्या कायद्यातील सुधारणांबाबत समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारची आंदोलने नाशिकमध्ये होत आहेत. मात्र प्रबोधन मंच या संस्थेच्या माध्यमातून शहराच्या सहा विभागांत तसेच देवळाली आणि भगूर येथेही मानवी साखळी उपक्रम राबविण्यात आला. वंदे मातरम, भारत माता की जय असे फलक झळकावून शांततामय मार्गाने हा उपक्रम राबविण्यात आला. यात कॉलेजरोड, मेरी रोड, मानूर नाका, पंचवटी कारंजा, सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सातपूर बसस्थानक, पवननगर, शिवाजी चौक, माउली लॉन्स, रथचक्र सोसायटी, पाथर्डी फाटा, काठेगल्ली, बिटको चौक, जेलरोड, जुने बस स्टॅन्ड देवळाली तसेच भगूर येथे या प्रकारचे समर्थन करण्यात आले.
दरम्यान नाशिकरोड येथील बिटको चौकात प्रबोधन मंच, भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी सायंकाळी मानवी साखळी करण्यात आली.वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देत प्रबोधन मंचच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ सावरकर चौक ते साईनाथनगर चौफुलीपर्यंत मानवी साखळी करण्यात आली होती. यावेळी देश के हित मे सबके हित मे, काश्मीर ते कन्याकुमारी भारत माता एक हमारी, भारतीय संविधानाचा विजय असो, सह विविध फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. याप्रसंगी मनपा सभागृहनेता सतीश सोनवणे, नगरसेवक अॅड. श्याम बडोदे, नगरसेवक अजिंक्य साने, राजश्री शौचे, अॅड. भानुदास शौचे, सचिन कुलकर्णी, अनिकेत सोनवणे, बापू गोरे, सह आबालवृद्ध सहभागी झाले होते.