‘अगर उंगली पे दाग लगने से अच्छी सरकार बनती है,
By Admin | Published: October 15, 2014 12:57 AM2014-10-15T00:57:43+5:302014-10-15T00:59:52+5:30
‘अगर उंगली पे दाग लगने से अच्छी सरकार बनती है,
नाशिक : ‘अगर उंगली पे दाग लगने से अच्छी सरकार बनती है, तो दाग अच्छा है’ अथवा ‘व्होट नॉट फॉर सेल’... अशा अनेक संदेशांच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर मतदारजागृती सुरू असून, व्हॉट्सअॅपची वॉल संदेशांनी ओसंडून वाहते आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही सोशल मीडियाचा प्रभावी वापर होताना दिसून येतो आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली होती. आता विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदारांना आवाहन करणारे पोस्टर्स ठिकठिकाणी लावले आहेत. काही सामाजिक-व्यावसायिक संस्थांमार्फतही मतदारजागृतीचे प्रयत्न केले जात असतानाच, व्हॉट्सअॅपवरही मतदारांना आवाहन करणारे संदेश, व्हिडीओ यांची गर्दी होऊ लागली आहे. प्रामुख्याने त्यात महापुरुषांनी दिलेल्या दाखल्यांचाही उल्लेख केला जात आहे. ‘राजनीति में हिस्सा न लेने का सबसे बडा दंड यह है की अयोग्य व्यक्ति आपपर शासन करने लगते है’, हे चाणक्याचे विधान उधृत करण्यात येत असून, ‘परीक्षेत एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला अन् लोकशाहीमध्ये एका मताला फार किंमत असते’, असा विचारही मांडण्यात आला आहे. शाई लावलेल्या बोटाला ‘नॉट फॉर सेल’चा टॅग लावलेली इमेजही व्हॉट्सअॅपवर फिरवत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले जात आहे. एका हिंदी कवयित्रीने ‘झूमका गिरा रे’ या गाण्यावर केलेल्या ‘नेता गिरा रे, वोटोंके बझार में’ ह्या विडंबन गीताचा व्हिडीओही अनेकांना शेअर केला जात आहे. (प्रतिनिधी)