मतदार यादीत फोटो नसल्यास नाव वगळणार : तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 06:02 PM2021-03-07T18:02:14+5:302021-03-07T18:03:16+5:30

सर्वतिर्थ टाकेद : मतदार यादीतील नावासमोर फोटो नसल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांचेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

If there is no photo in the voter list, the name will be omitted: Tehsildar | मतदार यादीत फोटो नसल्यास नाव वगळणार : तहसीलदार

मतदार यादीत फोटो नसल्यास नाव वगळणार : तहसीलदार

googlenewsNext
ठळक मुद्देलोकशाहीच्या बळकटीसाठी महत्त्वाची असलेली मतदान प्रक्रिया

सर्वतिर्थ टाकेद : मतदार यादीतील नावासमोर फोटो नसल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांचेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

लोकशाहीच्या बळकटीसाठी महत्त्वाची असलेली मतदान प्रक्रिया व्यवस्थित आणि पारदर्शक राबविण्याच्या उद्देशाने मतदार यादीतील नावाबरोबरच छायाचित्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांचे नावासमोर फोटो नसतील त्यानी आपल्या गावातील बीएलओ किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेशी १० मार्चपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन कासोळे यांनी केले आहे. ईगतपुरी मतदार संघात नाव आहे, पण फोटो नाही, असे २६६० मतदार आहेत. या सर्व मतदारांना साठी गावातील बीएलओे घरोघर जाऊन सर्व्हे करत आहेत.

Web Title: If there is no photo in the voter list, the name will be omitted: Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.