वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे पडणार महागात !
By admin | Published: April 5, 2017 12:47 AM2017-04-05T00:47:46+5:302017-04-05T00:52:07+5:30
नाशिक : वाहन चालविताना मोबाइलवर बोलण्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत़
नाशिक : वाहन चालविताना मोबाइलवर बोलण्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत़ या आदेशाचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले आहेत़ त्यामुळे वाहनचालकांनी मोबाइलवर न बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
शहरासह जिल्ह्यातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्याच संख्येने वाहनांचे अपघातही होत आहेत़ या अपघातांमध्ये मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे़ त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाईर् बरोबरच परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत़ पोलीस आयुक्त डॉ़रवींद्रकुमार सिंगल व प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्याकडून मोबाइल बोलणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ शहर वाहतूक पोलिसांकडून अशा चालकांचे परवाने जप्त करून ते प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविले जाणार असून, त्यानंतर निलंबित केले जाणार आहे़