इगतपुरीतील उपक्रम : कचºयाचे विघटन , मुलींचे शिक्षण, स्वच्छ परिसर, आरोग्याच्या रक्षणाला महत्व भिंतीवर चित्र रंगवुन जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:17 AM2018-02-05T00:17:44+5:302018-02-05T00:19:03+5:30

इगतपुरी : भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत शहरात वॉलपेंटींगची जिल्हा स्तरीय स्पर्धा राबवुन ओला कचरा, सुखा कचरा विघटन , बेटी पढाव, बेटी बचाव, स्वच्छ परिसर करी आरोग्याचे रक्षण, सुंदर प्रभाग करी पर्यावरणाचे रक्षण असे विषय देत स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाली.

Igatpuri activities: Disruption of waste, education of girls, clean premises, importance of protection of the people | इगतपुरीतील उपक्रम : कचºयाचे विघटन , मुलींचे शिक्षण, स्वच्छ परिसर, आरोग्याच्या रक्षणाला महत्व भिंतीवर चित्र रंगवुन जनजागृती

इगतपुरीतील उपक्रम : कचºयाचे विघटन , मुलींचे शिक्षण, स्वच्छ परिसर, आरोग्याच्या रक्षणाला महत्व भिंतीवर चित्र रंगवुन जनजागृती

googlenewsNext
ठळक मुद्दे२७० चित्र रंगवुन जनजागृतीपर संदेश वॉलपेंटींग स्पर्धाचे पारितोषीक वितरण

इगतपुरी : भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत निमित्त श्री गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था च्या वतीने संस्थापक अध्यक्ष तथा भाजप नगरसेवक दिनेश अर्जुन कोळेकर यांनी शहरात एक नविन संकल्प राबवुन प्रभाग क्र मांक मध्ये भव्य वॉलपेंटींग ची जिल्हा स्तरीय स्पर्धा राबवुन शहरातील भिंतीवर ओला कचरा, सुखा कचरा विघटन , बेटी पढाव, बेटी बचाव, स्वच्छ परिसर करी आरोग्याचे रक्षण, सुंदर प्रभाग करी पर्यावरणाचे रक्षण असे जनजागृतीचे विषय स्पर्धकांना देत हि स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाली. या वेळी शहरातील सुमारे ११० भिंतीवर २७० स्पर्धकांनी चित्र रंगवुन जनजागृतीपर संदेश दिला. या स्पर्धाचे उद्घाटन इगतपुरी नगर परिषदेचे मुख्यआधिकारी डॉ . विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते फित कापुन उदघाटन करण्यात आले. या वॉलपेंटींग स्पर्धाचे पारितोषीक वितरण कार्यक्र मात अध्यक्ष स्थानी भाजपाचे जिल्हा पक्ष निरिक्षक नितीन जाधव प्रमुख पाहुणे यशवंत दळवी, महेश श्रीश्रीमाळ, पोलीस उपनिरिक्षक महेश मांडवे, नगर सेवक योगेश चांडक, सुरेश संधान , कन्हैयालाल बजाज, शामसुंदर चांडक, प्रकाश धुमाळ, राजेंद्र सोनवणे, संतोष मानकर, जेष्ठ नागरीक संघाचे प्रमुख आर . परदेशी, श्रीकांत हाके, सुरेश दळवी, प्रकाश बोरकर, यांच्या हस्ते पारितोषीक देवुन विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी स्पर्धाचे नियोजन सुमीत बोधक, निलेश पुरोहित, सुनील वामने, किरण दगडे, पंकज परदेशी,बाळा सद्गुरू, सौरभ पासलकर, सागर खेमनर, पिनू दगडे, गिरीश दळवी, श्रीकांत हाके, सुरेश दळवी, प्रकाश बोरकर यांनी परिश्रम घेतले तसेच शिवराज्य मित्र मंडळ, आॅफीस बॉईज, बाल शिवाजी मित्र मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळ आदींनी सहकार्य केले.
रोख स्वरूपाची रक्कम
या स्पर्र्धेत रोख स्वरूपाची रक्कम तसेच सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र पारितोषिके देण्यात आली लहान, मोठया गटाला भाग घेतला होता या स्पर्धाचे परिक्षक म्हणुन कला निकेतन संचालित चित्रकला महाविद्यालया चे प्राचार्य अनिल भालींगे , प्राध्यापक संजय बागुल, प्रा . दिपक वर्मा यांनी परिक्षण केले. तर नियोजक म्हणुन राजेंद्र नेटावटे यांनी केले . शहरासाठी हि स्पर्धा एक नाविण्य पुर्ण संकल्पना असल्याने नागरीकानीं या उपक्रमाचे स्वागत केले.

Web Title: Igatpuri activities: Disruption of waste, education of girls, clean premises, importance of protection of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.