नांदूरवैद्य : इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून येथील शेतकऱ्यांचे जीवन भात पिकांवर अवलंबून असल्याने तसेच पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे हे पीक धोक्यात आले आहे. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेले भात पीक गवतासारखे वाळले असल्यामुळे शासनाने त्वरित इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा असे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील भारनियमन कायमचे बंद करून शेतकºयांसाठी दिवसा वीज उपलब्ध करु न देण्यात यावी. भात, सोयाबीन, नागली व इतर पिके पावसाअभावी अक्षरश: करपून गेली असून सदर पिकांचे पंचनामे करुन एकरी पन्नास हजार रु पये नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच अतिरिक्त भार असलेल्या रोहित्राच्या जागी नवीन रोहित्र बसविण्यात यावे. त्याचप्रमाणे आॅनलाईन उतारे काढणाºया शेतकºयांची होणारी लूट त्विरत थांबविण्यात यावी अशा महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले आहे.याप्रसंगी रामकृष्ण बोंबले, भगवान बोराडे, प्रभाकर थोरात, भिमराव बोराडे, बाळकृष्ण नाठे, सुनिल चौधरी, संजय सहाणे, तुकाराम सहाणे, दिलीप सहाणे, तानाजी झाडे, लक्ष्मण मते, शांताराम मते, योगेश हळकुंडे, रामदास सहाणे, बाळू पागेरे, चंद्रशेखर पाटील, बाळासाहेब कुकडे, सखाराम सहाणे, भागवत गुंजाळ आदी शेतकरी उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 5:21 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून येथील शेतकऱ्यांचे जीवन भात पिकांवर अवलंबून असल्याने तसेच पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे हे पीक धोक्यात आले आहे. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेले भात पीक गवतासारखे वाळले असल्यामुळे शासनाने त्वरित इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा असे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले आहे.
ठळक मुद्दे शेतकर्यांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले