समस्यांकडे डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:49 AM2018-04-16T00:49:34+5:302018-04-16T00:49:34+5:30

दिंडोरी : राज्य सरकारने किसान सभेला दिलेले आश्वासन पाळले नाही तर येत्या सहा महिन्यांत विधानभवनाला घेराव घालण्यात येईल, असा खणखणीत इशारा राज्य किसान सभेचे अध्यक्ष किसन गुजर तसेच आमदार जे. पी. गावित यांनी दिला.

Ignore problems | समस्यांकडे डोळेझाक

समस्यांकडे डोळेझाक

Next
ठळक मुद्देकिसन गुजर : किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांचा विजयी मेळावा भारिपसह आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत शक्तिप्रदर्शन

दिंडोरी : राज्य सरकारने किसान सभेला दिलेले आश्वासन पाळले नाही तर येत्या सहा महिन्यांत विधानभवनाला घेराव घालण्यात येईल, असा खणखणीत इशारा राज्य किसान सभेचे अध्यक्ष किसन गुजर तसेच आमदार जे. पी. गावित यांनी दिला.
दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किसान सभेच्या वतीने आयोजित लॉँग मार्च विजयी मेळाव्याप्रसंगी आमदार जे. पी. गावित अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, शेतकºयांचे कर्जमाफी व वनजमिनीचे प्रश्न प्रलंबित असल्याने किसान सभेच्या वतीने लाखोच्या संख्येने नाशिक ते विधानभवन लॉँग मार्च काढण्यात आला. शेतकºयांच्या समस्यांकडे राज्य सरकारने जाणून-बुजून डोळेझाक केली असून, वनजमिनीचे प्रश्न हाताळण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. येत्या सहा महिन्यांत शेतकºयांचे प्रश्न मार्गी न लावल्यास किसान सभेच्या वतीने विधानभवनाला घेराव घालण्यात येईल व लेखी स्वरूपात आदेश सरकारने दिले तर आंदोलन मागे घेण्यात येईल. अन्यथा होणाºया परिणामास शासन जबाबदार राहील, असा इशारा किसान सभेच्या वतीने आमदार जे. पी. गावित यांनी दिला. कार्यक्रमप्रसंगी जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार, जिल्हा सरचिटणीस सुनील मालुसरे, अ‍ॅड. दत्तू पाडवी, सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा गांगोडे, तालुका अध्यक्ष देवीदास वाघ, सेक्रेटरी रमेश चौधरी, भारिप जिल्हा सचिव सम्राट पगारे, सदस्य भीमराव गांगुर्डे, प्रमोद निकम, गणेश शार्दूल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाल, निळे झेंडे घेऊन मिरवणूकयावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिंडोरी शहरातून भारिपसह आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत शक्तिप्रदर्शन करीत लाल व निळे झेंडे घेऊन मिरवणुकीद्वारे बाजार पटांगण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

Web Title: Ignore problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.