पोलीस वसाहतीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:36 AM2019-10-01T01:36:20+5:302019-10-01T01:36:34+5:30
शरणपूररोडवर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या स्नेहबंधन पार्क पोलीस वसाहतीत राहणाºया शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने सध्या पोलीस कुटुंबीय विविध समस्यांनी त्रस्त झाले आहे.
पंचवटी : शरणपूररोडवर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या स्नेहबंधन पार्क पोलीस वसाहतीत राहणाºया शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने सध्या पोलीस कुटुंबीय विविध समस्यांनी त्रस्त झाले आहे.
स्नेहबंधन पार्क पोलीस वसाहतीत राहणाºया शेकडो पोलीस कर्मचाºयांना सध्या साफसफाई, घरातील नळ गळती डासांचा वाढलेला प्रादुर्भाव यांसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, शासकीय वसाहत असल्याने तक्र ार करायची कोणाकडे, असा सवाल पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
शरणपूररोडला शासनाने काही वर्षांपूर्वी पोलीस कर्मचाºयांना राहण्याची व्यवस्था म्हणून स्नेहबंधन पार्क पोलीस वसाहतीची निर्मिती करण्यात आली आहे. वसाहतीत एकूण ११ इमारती असून, प्रत्येक इमारतीत १६ सदनिका आहे. जवळपास पावणेदोनशे पोलीस कुटुंबीय इमारतीत राहतात. स्नेहबंधन पार्कमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांपूर्वी इमारतींना रंगरंगोटीचे काम करण्यात आले होते, मात्र पावसाने इमारतींचा रंग फिका पडला आहे. इमारत डागडुजी सुरू असताना सदनिकेतील स्वयंपाक खोलीसह बाथरूमचे नळ दुरुस्ती करण्यात आले खरे मात्र अवघ्या काही दिवसांतच त्यांची दुरवस्था झाली आहे.
इमारतींना दिलेला रंग व नळ दुरु स्तीचे काम काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याची दुरवस्था झाल्याचा आरोप पोलीस कुटुंबीयांनी करत सध्या सुरू असलेल्या कामाबाबत असमाधान व्यक्त केले आहे. सदर इमारतीत सर्व पोलीस कर्मचारी राहतात. शासकीय वसाहत असल्याने वसाहतीत उद्भवणाºया समस्या सोडविण्याचे काम शासन पातळीवर होणे गरजेचे असताना शासनाकडून शासकीय कर्मचाºयांची फरपट होत असल्याने तक्र ार करायची कोणाकडे, असा सवाल पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांनी व्यक्त करून नाव न सांगण्याच्या अटीवर स्नेहबंधन पार्क इमारतीतील समस्यांबाबत तक्र ार मांडली आहे.
डासांचा वाढता प्रादुर्भाव
सध्या स्नेहबंधन पार्क इमारतीत असलेल्या काही सदनिकांमध्ये पावसाळ्यात पाणी झिरपत असल्याने कधी स्वयंपाक खोलीत, तर कधी बेडरूममध्ये पाणी पडते त्यामुळे भिंतींना ओल आली आहे. याशिवाय परिसरात मातीचे ढिगारेदेखील पडलेले असून, नियमित औषध फवारणी, साफसफाई होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्र ार पोलीस कुटुंबीयांनी केली आहे.