पंधराव्या आयोगातून बेकायदा निधी खर्ची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:19 AM2021-08-21T04:19:00+5:302021-08-21T04:19:00+5:30
नांदगाव : तालुक्यातील वंजारवाडी येथील निवृत्त झालेल्या प्रशासकासह विद्यमान ग्रामसेवकाने संगनमताने पंधराव्या आयोगाच्या निधीतील रकमा प्राधिकृत कोषागारमार्फत न काढता ...
नांदगाव : तालुक्यातील वंजारवाडी येथील निवृत्त झालेल्या प्रशासकासह विद्यमान ग्रामसेवकाने संगनमताने पंधराव्या आयोगाच्या निधीतील रकमा प्राधिकृत कोषागारमार्फत न काढता स्वतःच्या नावाने धनादेशाद्वारे बेकायदा निधी खर्च केल्याने या दोघांवर फौजदारी गुन्हे दाखल करून ग्रामसेवकाला बडतर्फ करण्याची मागणी तालुका पंचायत समितीचे सभापती सुभाष कुटे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेत एका निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामसेवक बी.बी. गावित व प्रशासक या दोघांनी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी पीएफएमएस प्रणालीद्वारे न करता ४,५५,३८८/- इतकी रक्कम धनादेशाद्वारे अदा केलेली असल्याचे आढळून आल्याने दस्तुरखुद्द कुटे यांनी केलेल्या तक्रारीमुळे मोठी खळबळ उडाली. मुळातच चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले नसताना ग्रामसेवक व प्रशासकांनी पंधराव्या वित्त आयोगासाठी प्राप्त निधीला खर्ची टाकताना पीएफएमएस प्रणालीद्वारे करणे आवश्यक होते, हे कमी काय, तर याच ग्रामपंचायतीचा कर्मचाऱ्याने ग्रामनिधीमधून जमा झालेली ६० हजार ४७१ ही रक्कम खात्यात न भरता स्वतःकडे ठेवली, अशी तक्रारही सभापतींनी केली. ग्रामसेवक, प्रशासक, ग्रामपंचायत कर्मचारी या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी व बडतर्फ करण्यात यावे, तसेच प्रशासक यांचे भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युइटी, निवृत्तीवेतन रद्द करण्यात यावे व सदर रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी सभापती कुटे यांनी केली आहे.
------------------
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांच्याकडे निवेदन सादर करताना सभापती सुभाष कुटे.
(२० नांदगाव १)
200821\20nsk_26_20082021_13.jpg
२० नांदगाव १