देवळा येथे अवैध गुटखा, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:07 PM2020-02-27T13:07:23+5:302020-02-27T13:07:58+5:30

देवळा : येथील बाजार समितीच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे गुटखा विक्र ी करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करून दोन संशयितांना अटक करण्यात आली असून एक लाख १५ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 Illegal Gutkha, two arrested in Deola | देवळा येथे अवैध गुटखा, दोघांना अटक

देवळा येथे अवैध गुटखा, दोघांना अटक

googlenewsNext

देवळा : येथील बाजार समितीच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे गुटखा विक्र ी करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करून दोन संशयितांना अटक करण्यात आली असून एक लाख १५ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हयातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांचे आदेशान्वये विशेष पथकाची धडक कारवाई सुरू आहे. मंगळवारी दिनांक २५ रोजी ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी देवळा पो.स्टे. हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समतिी परिसरात अवैधरित्या गुटख्याची विक्र ी करणारे इसमांवर छापे टाकुन १ लाख १४ हजार रूपये किंमतीचा गुटखा/पानमसाला जप्त केला आहे. दिनांक २५ रोजी ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी हे देवळा परिसरात गस्त घालत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे पथकाने सायंकाळचे सुमारास कृषी उत्पन्न बाजार समतिी शिवारातील श्री स्वामी समर्थ किराणा स्टोअर्स गाळा नं २/ ३ व महालक्ष्मी किराणा सेंटर गाळा नं ०४ या ठिकाणांवर अचानक छापे टाकले, सदर ठिकाणी किराणा स्टोअर्स चे मालक सुनिल सुरेश सोनजे, वय ३५, रा. घर नं ३१० शिवाजी नगर, देवळा, सुरेश त्रंबक येवला, रा. घर नं ११८४ महात्मा गांधी रोड चावडी चौक सटाणा, ता. जि. नाशिक हे विनापरवाना बेकायदेशीर मानवी जिवीतास अपायकारक गुटखा, सुगंधित पानमसाला, तंबाखुजन्य पदार्थांची विक्र ी करतांना मिळुन आले. सदर दोन्ही ठिकाणी झडती घेतली. त्यात एकुण १,१४,३७७ रू. चा गुटखा, सुगंधित पानमसाला, तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाईत जप्त केलेला अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखु पुढील कारवाईसाठी अन्न औषध प्रशासन विभाग नाशिक यांचेकडे स्वाधीन केले आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या मा.पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकातील पोउपनि कल्पेश दाभाडे व त्यांचे पथकातील कर्मचारी यांनी अवैध धंदयावर कारवाई केली आहे.

Web Title:  Illegal Gutkha, two arrested in Deola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक