सावकीत वाळूचा अवैध उपसा

By admin | Published: November 11, 2016 11:18 PM2016-11-11T23:18:40+5:302016-11-11T23:44:32+5:30

संताप : वाळूमाफियांवर कारवाईची मागणी

Illegal slaughter of saline sand | सावकीत वाळूचा अवैध उपसा

सावकीत वाळूचा अवैध उपसा

Next

पिळकोस : देवळा तालुक्यातील सावकी येथील गिरणा नदीपात्रातून रात्रीतून मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असून, तहसील विभाग व पोलीस प्रशासन वाळूमाफियांवर कारवाई करत नसल्यामुळे सावकी येथील शेतकरी व ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
आज उपसरपंच कारभारी पवार, पोलीसपाटील आश्विनी बच्छाव, अरुण शिवले, केवळ भामरे, नीलेश पाटील, राजेंद्र बच्छाव यांनी प्रत्यक्ष गिरणा नदीपात्रात जाऊन पाहणी केली असता गिरणा नदीपात्र वाळू उपशामुळे पाच ते सात फूट खोल गेले असून, नदीत सर्वत्र खोल खड्डे झाले असल्याने सावकी गावातील शेती धोक्यात आली असल्याने वाळू उपशाला अभय देणाऱ्या महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात सावकी येथील ग्रामस्थ, उपसरपंच कारभारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा तहसीलसमोर उपोषणास बसणार असून, शिष्टमंडळ घेऊन महसूल मंत्र्यांकडे ही दाद मागणार असल्याचे सांगितले. सावकी येथील गिरणा नदीपात्रातून होणाऱ्या वाळू उपशाबाबत सावकी गावातील सरपंच कारभारी पवार, अरुण शिवले व गावातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण यांनी वेळोवेळी एकत्र येऊन वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाला पकडून देऊनही देवळा महसूल विभाग वाळूमाफियांवर कारवाई करत नसून महसूल विभाग व पोलीस प्रशासन हे वाळूमाफियाना अभय देत असल्याचा आरोप सावकी ग्रामस्थांकडून केला जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Illegal slaughter of saline sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.