नाशिक : शहरात अनेक ठिकाणी गौरींसह गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गौरींचे विसर्जन औपचारिक असले तरी अनेक ठिकाणी जलशयात गणपतींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेने रामकुंडासह अन्य भागात विसर्जित मूर्ती दान स्वीकारण्याचीही व्यवस्था केली होती.गणरायांचे आगमन झाल्यानंतर दोन दिवसाांपूर्वी अनुराधा नक्षत्रावर शेकडो घरांमध्ये ज्येष्ठ गौरींचे आगमन झाले होते. मुखवटे, सुगड , कागदावरील चित्रे आणि काही ठिकाणी खडड्यांच्या गौरींची पुजा बांधण्यात आली. बुधवारी (दि. २६) पुजन आणि गौरी भोजनानंतरगुरूवारी (दि.२७) विधिवत विसर्जन करण्यात आले. नाशिक शहरात अनेक घरांमध्ये गौरी बरोबरच गणरायाचे विर्सजन करण्याची परंपरा आहे.महापालिकेने अधिकृत विसर्जन स्थळांबरोबरच गणेश विसर्जनासाठी कृत्रिम कुंडांची देखील व्यवस्था केली होती. शहरातील आनंदवली, आयटीआय पुल, तसेच चोपडालॉन्स, हनुमान घाट आणि म्हसोबा पटांगण परिसरात विर्सजन करणयवर भर होता. महापालिकेकडून निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती.
शहरात अनेक ठिकाणी गौरींसह ‘श्री’चेही विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 1:10 AM
शहरात अनेक ठिकाणी गौरींसह गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गौरींचे विसर्जन औपचारिक असले तरी अनेक ठिकाणी जलशयात गणपतींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेने रामकुंडासह अन्य भागात विसर्जित मूर्ती दान स्वीकारण्याचीही व्यवस्था केली होती.
ठळक मुद्देउत्सव : प्रमुख ठिकाणी मूर्ती संकलन