प्रभाव ‘लोकमत’चा...... मुकणे धरणाचा विसर्ग झाला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 07:08 PM2018-12-11T19:08:00+5:302018-12-11T19:10:05+5:30
वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून गेल्या मिहनाभरापासुन सुरु असलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी सकाळी बंद करण्यात आला. लोकमतमध्ये छापुन आलेल्या वृत्तानंतर पाठबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ वाजता धरणावर येवून सुरु असलेला विसर्ग बंद केला.

मूकणे धरणातून १५ नोव्हेंबर पासून ते मंगळवार (दि.११) सकाळ पर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलेले होते, त्यामुळे १७१७ द.ल.घ.फू. इतके पाणी प्रवाहीत झाले आहे. हे पाणी वैजापूर एक्सप्रेस कालव्यासाठी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर फक्त ३०१४ द.ल.घ.फू. म्हणजे ४१.६३ इतकेच पाणी धरणात शिल्लक आहे. असे असतांना इगतपुरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नेते यांनी ठोस भूमिका घेतली नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. मंगळवारी जेंव्हा लोकमतमध्ये हे वृत्त छापुन आले तेंव्हा तात्काळ हे पाणी बंद करण्यात आले.
३०१४ द.ल.घ.फू. पाण्यापैकी यावर्षी ४०० दलघफू पाणी नाशिक शहरासाठी राखीव राहणार आह.े तर ६०० द.ल.घ.फू. पाणी हे नदी तिरावरील शेतकºयांसाठी राखीव असणार आहे. आणि जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आणखी एक आवर्तन राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे अखेर धरणात फक्त मृत साठाच शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागण्याची भीती वर्तविली जात आहे.