गावठी दारू अड्ड्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:08 PM2019-04-12T22:08:37+5:302019-04-12T22:10:53+5:30
खर्डे : येथे अवैध गावठी दारू अड्ड्यांवर छापा टाकण्यात येऊन जवळपास ४१ हजार ५५० रुपयांचे साहित्य नष्ट करण्यात आल्याची माहिती देवळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.
खर्डे येथे आदिवासी वस्तीवर साहित्य नष्ट करताना पोलीस कर्मचारी.
खर्डे : येथे अवैध गावठी दारू अड्ड्यांवर छापा टाकण्यात येऊन जवळपास ४१ हजार ५५० रुपयांचे साहित्य नष्ट करण्यात आल्याची माहिती देवळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.
याबाबत देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील अवैध व्यवसाय पूर्णत: बंद करण्यासाठी देवळा पोलिसांनी हत्यार उपसले आहे. त्या अनुषंगाने शनिवारी खर्डे अदिवासी वस्तीवर पहाटेच्या सुमारास अवैध गावठी दारू बनविणाऱ्या अड्ड्यांवर छापा मारून दारू बनविताना संशयितांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी पोलिसांनी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ताब्यात घेऊन व रसायन मिळून अंदाजे ४१ हजार ५५० रु पयांचे साहित्य जागीच नष्ट करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, सुदर्शन गायकवाड, भास्कर ठोके, बर्डे, हेंबाडे, नीलेश सावकार, पोलीस-पाटील भारत जगताप सहभागी झाले होते. अवैध गावठी दारू बंद करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी ग्रामसभेत केली होती. तरीदेखील हा व्यवसाय बंद होत नसल्याने या महिलांनी नाराजी व्यक्त केल्याने, पोलिसांनी येथील दारूविक्रेत्यांवर अशीच कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.