जैवविविधता परिषदेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

By admin | Published: October 11, 2014 09:54 PM2014-10-11T21:54:02+5:302014-10-11T21:54:02+5:30

जैवविविधता परिषदेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

Inauguration of Biodiversity Council website | जैवविविधता परिषदेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

जैवविविधता परिषदेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

Next

 

नाशिक : भारत-युरोप शैक्षणिक आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत नांदगाव महाविद्यालयात डिसेंबर २०१४ मध्ये ‘जैवविविधता’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून, त्यासंबंधी माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटन फ्रान्सच्या प्वातिएर विद्यापीठातील प्रा. योनाएल बेरनॉर्ड यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भारत-युरोप शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक प्रा. दीपक मगरे, महासचिव माधव गाडगीळ, कोषाध्यक्ष प्रा. प्रभाकर जाधव आदिंसह केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. काजळे, प्रा. संजय शिंदे आदि उपस्थित होते. नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर. भाबड यांनी स्वागत, तर प्रा. दर्शन कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Inauguration of Biodiversity Council website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.