कोठुरे येथे पेटी वाचनालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 11:03 PM2020-09-02T23:03:41+5:302020-09-03T01:46:05+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यातील कोठुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या वतीने पेटी वाचनालयाचे उद्घाटन कोठुरे फाटा येथील हनुमान मंदिर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
सायखेडा : निफाड तालुक्यातील कोठुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या वतीने पेटी वाचनालयाचे उद्घाटन कोठुरे फाटा येथील हनुमान मंदिर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
मोबाइल, इंटरनेट, व्हिडिओ गेम यामध्ये आजची पिढी अडकली जात आहे. त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या काळात दिसतील त्यापासून दूर राहाण्यासाठी ग्रामीण भागात वाचनालयातून वाचन संस्कृती उभी राहिली पाहिजे, असे मत बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केले. या उद्घाटनास गटशिक्षणाधिकारी
केशव तुंगार, मोतीराम मोगल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उपस्थित होते.
पेटी वाचनालयासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रताप मोगल, तुळशीराम आहेर, रमेश मोगल, गोरक्षनाथ आहेर या सर्वांंनी ३५१ पुस्तके वाचनालयास भेट दिली. गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येत आहे. गावातील युवक मंडळांनी वाचनालय पुस्तके देवघेव करण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली.
यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील सातभाई, समाधान मोगल, किरण मोगल पिंपळस शाळेचे मुख्याध्यापक बावीस्कर, जयराम मोगल, मुख्याध्यापक ललितकुमार महाजन, प्रकाश कोकाटे, रामदास चोभे यासह व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ व पालक, शिक्षक उपस्थित होते.