कळवण महाविद्यालयात युवा सप्ताहाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 09:06 PM2021-01-13T21:06:24+5:302021-01-14T00:13:37+5:30
कळवण : तालुक्यातील मानूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
कळवण : तालुक्यातील मानूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. पगार होते. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बोरसे, उपप्राचार्य राजेंद्र कापडे, प्रा. एस. एम. पगार, प्रा. पूनम वाघेरे आदी उपस्थित होते.
सशक्त आणि बुद्धिमान तरुण पिढी देशाचे भविष्य असल्याने स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक घडण्यासाठी तरुणाईने विवेकशील विचार आत्मसात करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते, इतिहास अभ्यासक राकेश हिरे यांनी केले.
यावेळी बोरसे, डॉ. बी. एस.पगार, आदींची भाषणे झाली. या प्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आभार ईश्वर पगार याने मानले. यावेळी प्रा. एस. जे. पवार, प्रा. मिलिंद वाघ, प्रा. एम. एन. पाटील, प्रा. डॉ. यू. के. पवार, प्रा. एम. व्हि. बोरसे, प्रा. इंगळे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.