धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 06:30 PM2018-08-18T18:30:20+5:302018-08-18T18:31:44+5:30
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सुरूवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये वाढ होत आहे. दिंडोरी तालुक्यात धरणांचे पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून उर्वरीत तीन धरणांमध्ये समाधानकारक साठा झाला आहे.
दिंडोरी : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सुरूवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये वाढ होत आहे. दिंडोरी तालुक्यात धरणांचे पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून उर्वरीत तीन धरणांमध्ये समाधानकारक साठा झाला आहे.
दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव व करंजवण हे तीन धरणं ९० टक्के पेक्षा जास्त भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वाघाड ओवरफ्लो झाले असून त्यातून सुमारे १४७७ क्यूसेस पुर पाण्याचा प्रवाह सुरू आहे. करंजवन धरण ९५ टक्के भरले असून १६०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कादवा नदीद्वारे पालखेड धरणात सोडले आहे. पुणेगाव ८८ टक्के भरले असून त्यातून ८५० क्यूसेस उनंदा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
तर ओझरखेड ८८ टक्के भरले आहे तिसगाव ४४ टक्के भरले आहे तर पालखेड धरणात ६१ टक्के झाला असून कादवा नदी व डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती नुरूप विविध धरणातून पााण्याचा विसर्ग करावा लागणार असल्याने,नदी काठच्या नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात जावू नये व सतर्क रहावे असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.
बागलाण तालुक्यात समाधानकारक पाऊस, शेतकºयांमध्ये समाधान
बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्यादांच दोन माहिन्यानंतर समाधान कारक पाऊस होऊन आरम नदीला पुर आला. मात्र मुंजवाड गांवाजवळील हया पुलावर कठडे नसल्याने अद्याप बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असुन रात्री बेरात्री पाण्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता असुनह्या विभागाने पुलावरील मजबुत कठडे बांधुन दुरर्स्ती करावी अशी मागणी माजी उपसरपंच हरिकांत सुर्यवंशी यांनी केली आहे.
ोथील परिसरात पहिल्यादांच समाधान कारक पाऊस झाला, अन्यथा पिके वाया जान्याची भिती होती. मात्र हा पुल हा सुमारे वर्षापासुनचा असुन पुर्ण जीर्ण अवस्थेत आहे. पुलाचे दोन्ही बाजुकडील सिमेटचे व लोखंडी पाईपचे कठडे तुटले असुन पुलाची दुरावस्था झााली आहे. येथील पुलावरु न वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. आदिवासी भागातील सुमारे ३८ खेड्यांना जोडणारा हा पुलावरील रस्ता आहे. सटाणा डांगसौदाणेकडून जाणाºया व येणारे वाहने या पुलावरु न येतात हा पुल सुमारे १९६९ मध्ये बांधण्यात आला आहे परंतु सुमारे ४७ वर्षानंतर हा पुल धोकादायक होत असुन पंधरा दिवसापुर्वी चोरट्यानी सिमेंटचे कठडे तोडले.