निफाड तालुक्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 11:40 PM2021-04-01T23:40:33+5:302021-04-02T01:09:37+5:30
लासलगाव : जिल्ह्यात सर्वाधिक १४११ कोरोना रूग्ण निफाड तालुक्यातील असल्याने आरोग्य यंत्रणा गतिमान झाली आहे. निफाड तालुक्यातील खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेणारे व संभाव्य रूग्णांची संख्या तातडीने दररोज अद्ययावत माहिती आरोग्य विभागात देण्याचे आवाहन तालुका कोरोना संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.
लासलगाव : जिल्ह्यात सर्वाधिक १४११ कोरोना रूग्ण निफाड तालुक्यातील असल्याने आरोग्य यंत्रणा गतिमान झाली आहे.
निफाड तालुक्यातील खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेणारे व संभाव्य रूग्णांची संख्या तातडीने दररोज अद्ययावत माहिती आरोग्य विभागात देण्याचे आवाहन तालुका कोरोना संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.
तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील कोरोना देखभाल केंद्रात ५० रूग्ण दाखल असून तेथील बेडस मर्यादा संपलेली आहे. लासलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल कोरोना उपचार केंद्रात ३० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर शासनाने अधिकृत मंजूर केलेल्या कोरोना खाजगी पाच रूग्णालयात ११० रूग्ण उपचार घेत असून पॉझिटिव्ह आलेले आहेत. ६५० रूग्ण घरीच होम आयसोलेटेड आहेत, असे तालुक्यातील ८८६ रूग्ण देखरेखीखाली आहेत अशी माहिती तालुका कोरोना संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.