मुख्य सुत्रधाराच्या पोलिस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 07:08 PM2021-03-24T19:08:38+5:302021-03-24T19:10:27+5:30
देवळा : येथील बनावट मुद्रांकाद्वारे खोटे दस्तऐवज तयार करून खरेदी करण्यात आलेल्या शेतजमीन प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
देवळा : येथील बनावट मुद्रांकाद्वारे खोटे दस्तऐवज तयार करून खरेदी करण्यात आलेल्या शेतजमीन प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान या प्रकरणी शिवसंग्राम युवक आघाडीच्या वतीने पिडीत शेतकरी भास्कर निकम तसेच सर्वपक्षीय नेत्यांसह पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले व ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुद्रांक घोटाळा प्रकरणी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी पिडीत शेतकरी भास्कर निकम तसेच सर्वपक्षीय नेत्यांसह पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले व ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत वाघ याला देवळा पोलिसांनी अटक केल्यानंतर १७ मार्च रोजी कळवण न्यायालयात हजर केले असता प्रथम तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा २० मार्चला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची वाढ करत २३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
गोटु वाघ यास मंगळवारी कळवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा एकदा दोन दिवसांची वाढ करत २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर, शहर अध्यक्ष संतोष शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलिप पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुनिल पवार, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, शेतकी संधाचे अध्यक्ष चिंतामण आहेर, युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सुर्यवंशी आदींनी पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन दिले.