निफाड तालुक्यात एकाच दिवसात ९ रु ग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 06:04 PM2020-06-25T18:04:50+5:302020-06-25T18:05:16+5:30

निफाड : तालुक्यात गुरु वारी एकाच दिवसात ९ कोरोनाबधित रु ग्णांची वाढ वाढल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.

An increase of Rs. 9 in a single day in Niphad taluka | निफाड तालुक्यात एकाच दिवसात ९ रु ग्णांची वाढ

निफाड तालुक्यात एकाच दिवसात ९ रु ग्णांची वाढ

Next
ठळक मुद्देखरीप हंगाम पेरणी तयारी व इतर विषयाचा त्यांनी आढावा घेतला.

निफाड : तालुक्यात गुरु वारी एकाच दिवसात ९ कोरोनाबधित रु ग्णांची वाढ वाढल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरु वारी (दि.२५) विंचुर येथे ४४ वर्षीय पुरु ष, पिंपळगाव बसवंत येथे ५५ वर्षीय महिला, पिंप्री रौळस येथे १० वर्षीय मुलगी, आहेरगाव येथे २९ वर्षीय महिला, ३ वर्षाचा मुलगा, ३३ वर्षाचा पुरु ष, ५४ वर्षाची महिला, ५ वर्षाचा मुलगा, करंजी येथे २४ वर्षाचा पुरु ष असे ९ रु ग्ण आढळले आहेत.
बुधवारी (दि.२४) पिंपळस रामाचे येथे ७५ वर्षीय कोरोनाबधित महिला मृत झाली आहे. त्यामुळे पिंपळस रामाचे येथे कोरोनामुळे मृत झालेल्याची संख्या २ झाली आहे. आतापर्यत निफाड तालुक्यात कोरोनामुळे ८ जण मृत झाले आहेत.
बुधवारी निफाड शहरात २२ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. नाशिक येथे ही मुलगी तिच्या मैत्रिणीच्या संपर्कात आली होती, तिची मैत्रीण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या मुलीला होम कॉरन्टाईन करण्यात आले होते. तिचा स्वाब तपासणीसाठी खाजगी लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. तो अहवाल बुधवारी पॉझििटव्ह आला या मुलीला उपचारासाठी लासलगाव येथील कोरोना कोव्हिडं सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे तर व तिच्या संपर्कात आलेल्या घरातील एका सदस्यांला पिंपळगांव बसवंत येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. निफाड शहरात सदर मुलगी राहत असलेला परिसर कॉन्टन्मेंट झोन करण्यात आला आहे.
दरम्यान गुरु वारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निफाड प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली व निफाड तालुक्यातील कोरोनाच्या बाबतीत चालू असलेल्या उपाययोजना व परिस्थिती या सर्व बाबीचा आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना केल्या तसेच खरीप हंगाम पेरणी तयारी व इतर विषयाचा त्यांनी आढावा घेतला.
याप्रसंगी प्रांत अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप कराड, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन काळे, निफाड उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन मोरे आदींसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Web Title: An increase of Rs. 9 in a single day in Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.