मालेगावी फळांच्या मागणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:21+5:302021-04-20T04:15:21+5:30
---- ग्रामीण भागातील बससेवा बंद मालेगाव : तालुक्यातील काही भागातील बससेवा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी ...
----
ग्रामीण भागातील बससेवा बंद
मालेगाव : तालुक्यातील काही भागातील बससेवा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत. तालुक्यातील देवघट, झाडी, एरंडगाव यासह शेवटच्या टोकाला असलेल्या गावांच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, या गावातील ग्रामस्थांना मालेगावी येण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
----
पाणपोई सुरू करण्याची मागणी
मालेगाव : शहर व परिसरात उन्हाचा कडाका वाढला आहे. तापमानाने चाळिशी पार केली आहे. कोरोनामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल व रेस्टॉरंट बंद आहेत. असे असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सार्वजनिक पाणपोई सुरू केल्या तर वाटसरूंची तहान भागविली जाईल. बंद पडलेल्या पाणपोई पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
----
गिरणा नदीला आवर्तन सोडण्याची मागणी
मालेगाव : चणकापूर व पूनद धरणातून आरक्षित करण्यात आलेले पाण्याचे आवर्तन गिरणा नदीपात्रात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे. गिरणा काठावरील गावांना सध्या पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. शेतशिवारातील विहिरींनीही तळ गाठला आहे. चणकापूर व पूनद धरणातील आरक्षित पाणी टेहरेपर्यंत सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
------
ग्रामीण भागात सर्रास गावठी मद्य विक्री
मालेगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रासपणे गावठी दारू विक्री केली जात आहे. संचारबंदीमुळे शहर व तालुक्यातील बार बंद आहेत. परिणामी, मद्यपींनी गावठी दारूकडे मोर्चा वळविला आहे. शहरालगतच्या काही गावांमध्ये दारू पिण्यासाठी मद्यपींची गर्दी होत आहे. ग्रामीण भागात सर्रास गावठी मद्याची विक्री केली जात आहे. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
----
चंदनपुरीत २३८ नागरिकांचे लसीकरण
मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी येथे आरोग्य उपकेंद्राकडून २३८ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. देसले, मळगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली जोगदंड, मनोज पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती.
----
मालेगावी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक
मालेगाव : गुन्हा करण्याच्या हेतूने गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या रब्बानी कादीर शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १५ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायझिंगजवळ रब्बानी कादीर हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला होता. पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांना माहिती मिळताच त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.