सोहळ्यात विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी शाळेने या कार्यक्रमाची फेसबुक व यू-ट्यूबद्वारे प्रत्यक्ष प्रसारणाची सुविधा केली होती. स्वातंत्र्य दिन सोहळ्याप्रसंगी शाळेचे प्राचार्य बी. एन. शिंदे यांनी, सध्या जगाला कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपली नैतिक जबाबदारी ओळखून शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून स्वत:बरोबरच समाजाची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. शाळेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थी अस्तित्व अनुप पवार याने स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचे महत्त्व सांगितले, श्रद्धा देवरे, धनश्री बगे व सर्वेश वाघ या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे मराठी हिंदी व इंग्रजी या भाषांमधून स्वातंत्र्याविषयीचे विचार मांडले. शालेय विद्यार्थ्यांनी ‘कोरोना परिस्थिती व शाळा’ या विषयावर आधारित नाटिका सादर केली. स्कूल कमिटीचे अध्यक्ष विलास शिरोरे यांनीही विचार व्यक्त केले. शाळेचे ज्यू. कॉलेजचे प्राचार्य जे. एल. पटेल यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शैलेश पवार, शाळेचे सचिव अनुप पवार, विलास शिरोरे, गजानन सोनजे, साहेबराव पवार, हिरामण पाटील, श्रावण आहेर, मंगेश भावसार तसेच फार्मसी कॉलेजचे प्राचार्य अविश मारू, किशोर कोठावदे, बी.एड कॉलेजच्या प्राचार्या भारती सोनवणे, प्रेरणा फाउंडेशनचे संचालक जीवन ठाकरे व गुरुदत्त उद्योगसमूहातील सर्व शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गिरणा बँक व सप्तशृंगी महिला बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - १८ शरद पवार स्कूल
शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजरोहणाप्रसंगी पांडुरंग पाटील, तुषार पाटील, नरेंद्र पवार, दुर्वास कोठावदे व राजेंद्र वेढणे, प्राचार्य बी. एन. शिंदे आदी.
180821\18nsk_24_18082021_13.jpg
फोटो - १८ शरद पवार स्कूल शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजरोहनप्रसंगी पांडुरंग पाटील , तुषार पाटील, नरेंद्र पवार , दुर्वास कोठावदे व राजेंद्र वेढणे , प्राचार्य बी एन शिंदे