संगमेश्वर : मुंबई येथे मॅग्नेटिक महाराष्टÑ परिषद झाली. यात मालेगावातील तरूण उद्योजकांनी सहभाग घेतला. या परिषदेत उभारण्यात आलेल्या ‘मालेगाव इंडस्ट्रियल हब’ला अनेक मान्यवरांनी भेट देऊन प्रशंसा केली. मालेगावच्या औषधी साखर उत्पादनातील एम. बी. शुगर प्रा. लि., कापड उद्योगातील एच. पी. टेक्सटाइल्स यांच्यासह अन्य नवउद्योजकांचे स्टॉल येथे उभारण्यात आले होते. मालेगावची इंडस्ट्रियल हब म्हणून गुंतवणूकदारांना ओळख व्हावी या हेतूने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून चार स्टॉल्सची उभारणी करण्यात आली होती. मालेगाव इंडस्ट्रियल हब नावाने उभारण्यात आलेल्या स्टॉलला महाराष्टÑ राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, रेमंड उद्योग समुहाचे गौतम सिंघानिया आदी मान्यवरांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. या स्टॉलच्या माध्यमातून मालेगावच्या ब्रॅण्डिंगला चालना मिळू शकेल अशी आशा उद्योजकांनी व्यक्त केली आहे. अनेक नवउद्योजक व गुंतवणूकदारांनी शहरालगत सुरू होत असलेल्या औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणीची तयारी दर्शविली आहे. या परिषदेत सम्यक लोढा, अरविंद पवार, मनोज बाहेती, श्याम मुंदडा, चिंतन जैन, तुषार बोरसे, पवन जाधव, नितीन देवरे, प्रतीक देसाई आदी उद्योजकांनी सहभाग घेतला.
इंडस्ट्रियल हबचा मुंबईच्या प्रदर्शनात सहभाग मालेगाव : तरुण उद्योजकांनी मांडले होते स्टॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 12:12 AM
संगमेश्वर : मुंबई येथे मॅग्नेटिक महाराष्टÑ परिषद झाली. यात मालेगावातील तरूण उद्योजकांनी सहभाग घेतला.
ठळक मुद्देमान्यवरांनी भेट देऊन प्रशंसा केलीमालेगावच्या ब्रॅण्डिंगला चालना मिळू शकेल