काळ्या अळीचा सागाच्या झाडांवर प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:38 PM2020-06-29T17:38:29+5:302020-06-29T17:39:11+5:30

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय ? अशी भिती या भागातील ज्येष्ठआदिवासी शेतकरी व्यक्त करीत असून, प्रथमच काळ्या अळीचा सागावर झालेला प्रादुर्भाव अनुभवला असल्याचे त्यांनी सांगितले.

Infestation of black larvae on saga trees | काळ्या अळीचा सागाच्या झाडांवर प्रादुर्भाव

काळ्या अळीचा सागाच्या झाडांवर प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देउपाययोजनेसाठी निसर्ग अन्पर्यावरण संस्थेचे वनविभागास निवेदन

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय ? अशी भिती या भागातील ज्येष्ठआदिवासी शेतकरी व्यक्त करीत असून, प्रथमच काळ्या अळीचा सागावर झालेला प्रादुर्भाव अनुभवला असल्याचे त्यांनी सांगितले. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर कुवर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण (प्रादेशिक) यांना याबाबत योग्य उपाय योजना कराव्यात यासाठी सोमवारी निवेदन दिले.
कळवण तालुक्यातील जिरवाडे, जामले, दरेगाव, कोसुरडे, भाकुरडे, करंमभेळ, कुंमसाडी आदी भागातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या डोंगरावर विविध प्रकारची जंगली झाडे आहेत. मात्र अज्ञात अळीच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र या पश्चिम पट्यात ज्या ज्या ठिकाणी ही सागाची झाडे आहेत, त्याठिकाणी पाने काळ्या रंगाचा अळीने खाल्यामुळे येथील डोंगरावर ठीक ठिकाणी पांढरे भुरकट पट्टे निर्माण झाले आहेत, व सागाच्या झाडावर आलेली हिरवीगार मोठमोठी पाने नष्ट होत आहे. त्यामुळे सागाच्या झाडाच्या वाढीवर परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे निसर्ग व पर्यावरणाचे अस्तित्व या भागात धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
वेळीच या अळीवर उपाय योजना न केल्यास इतर झाडे, वनस्पती व डोंगर उताºयावर असलेल्या शेतीत याअळीने शिरकाव केल्यास आदिवासी शेतकऱ्यांचे शेत पिकांचे प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित वनविभागाने याकडे वेळीच लक्ष घालून उपाय योजना कराव्यात अशी मागणी डॉ. कुवर यांनी केली आह.े

कळवण तालुक्यातील डोंगरांवरील काळ्या अळीचा सागावरील प्रादुर्भाव वाढतच गेला तर शेजारील गुजरात राज्यात असलेल्या सापुतारा परिसरातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या सागाच्या जंगलात शिरकाव झाल्यास शेत पिकांबरोबर जंगल संपत्तीचे परिणामी निसर्ग व पर्यावरनाचे नुकसान होईल.त्यासाठी वनविभागाने याबाबत वनस्पतीशास्त्र तज्ज्ञांचे मत जाणून घेऊन योग्य ती उपाय योजना करावी.
- डॉ. किशोर कुवर, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास.

Web Title: Infestation of black larvae on saga trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.