बाजारात फळभाज्यांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:51 AM2018-12-22T00:51:14+5:302018-12-22T00:51:34+5:30
सध्या हिवाळा ऋतू असल्याचे फळभाज्या आणि पालेभाज्यांची मागणी वाढली आहे. त्यात पालेभाज्यांची काही प्रमाणात कमी असून, फळभाज्यांची आवक वाढली आहे. विशेषत: गाजर आणि वटाणा यांची ग्राहकांकडून मागणी वाढलेली दिसून येते.
नाशिक : सध्या हिवाळा ऋतू असल्याचे फळभाज्या आणि पालेभाज्यांची मागणी वाढली आहे. त्यात पालेभाज्यांची काही प्रमाणात कमी असून, फळभाज्यांची आवक वाढली आहे. विशेषत: गाजर आणि वटाणा यांची ग्राहकांकडून मागणी वाढलेली दिसून येते.
गाजर आणि वटाणा हे शरीरासाठी उष्ण आणि पौष्टिक असल्याने हिवाळा ऋतूमध्ये ग्राहकांचा त्यांच्या खरेदीकडे जास्त कल दिसून येतो. नाशिकमध्ये पंजाब, इंदूर, हरियाणा या ठिकाणाहून गाजर आणि वटाणा यांची जास्त प्रमाणात आयात केली जाते.गाजराचा उपयोग हा हलवा, लोणचे, सूप, जाम, कोशिंबिर आदी पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही गाजराचा उपयोग केला जातो. गाजरामध्ये कॅल्शियम, लोह, अ, ब, क जीवनसत्वे असतात. सध्या गाजराचे दर २० ते ३० रुपये किलो असून, वटाण्याचे दर ३० रुपये किलो असा आहे. त्याचप्रमाणे फ्लॉवर कोबी, दोडके, भेंडी, गिलके यांची मागणी वाढली आहे. टमाटा आणि बटाट्याचे दर मात्र घसरले आहेत.