मालेगाव मध्य भागावर कृषिमंत्र्यांकडून अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 10:51 PM2022-05-16T22:51:27+5:302022-05-16T22:51:27+5:30
मालेगाव : राज्य शासनाने मालेगावच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून मध्य भागावर अन्याय केला जात असल्याचा आरोप जनता दलाचे नेते मुस्तकीम डिग्निटी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मालेगाव शहरासाठी शंभर कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. या कामांच्या यादीत मालेगाव मध्य मतदार संघातील कामांचा समावेश नसल्याचे डिग्निटी यांनी म्हटले आहे. महापालिकेने ३० टक्के व शासनाचा ७० टक्के हिस्सा असताना केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात १४ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे, तर उर्वरित ८६ कोटी रुपये शहराच्या पश्चिम व इतर भागातील कामांसाठी वापरण्यात येणार आहे.
हा प्रकार मालेगाव मध्य मतदारसंघावर अन्यायकारक आहे. जॉगिंग ट्रॅक कामाबद्दलही जनतेची दिशाभूल करण्यात आली असून महापालिकेच्या ठरावाबाबत राजकारण केले जात आहे. साफसफाईचा ठेका देण्याचा घाट रचण्यात आला आहे. शहरात स्वच्छता होत नाही. त्यामुळे स्वच्छतेचा दिलेला ठेका रद्द करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला जनता दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.