अभिनव वृक्ष रेखाटन प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:20 AM2018-04-23T00:20:49+5:302018-04-23T00:20:49+5:30
वसुंधरा दिनाचे औचित्य साधत चित्रकर्ती रत्ना भार्गवे यांचे अभिनव वृक्ष रेखाटन प्रदर्शनाचे उद्घाटन कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ पं. प्रभाकर दसककर, संगीत विदुषी डॉ. अलकादेव मारुलकर आणि छायाचित्रकार प्रसाद पवार उपस्थित होते.
नाशिक : वसुंधरा दिनाचे औचित्य साधत चित्रकर्ती रत्ना भार्गवे यांचे अभिनव वृक्ष रेखाटन प्रदर्शनाचे उद्घाटन कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ पं. प्रभाकर दसककर, संगीत विदुषी डॉ. अलकादेव मारुलकर आणि छायाचित्रकार प्रसाद पवार उपस्थित होते. ‘एकतत्त्व वृक्ष : दृष्टी तशी सृष्टी’ या प्रदर्शनात वृक्षांची अनोखी अशी ६० रेखाचित्रे मांडली आहेत. चित्रांचे रेखाटन काळ्या व पांढऱ्या शाईने करण्यात आले आहे. रेषा आणि बिंदू यांच्या अनुरूप मेळास कल्पनाशक्तीची जोड देऊन साकारलेली ही चित्रे आपणास वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. साकारलेले वृक्षांचे प्रकार अपरिचित वाटत नाहीत, उलट आपण हे वृक्ष कुठे ना कुठे बघितले आहेत असेच जाणवते. निसर्गाकडे बघण्याची दृष्टी बदलून टाकण्याची शक्ती या चित्रांमध्ये सामावलेली आहे हे नक्की. वृक्षांमधील चैतन्य, भावना व संवाद साधण्याची कला या रेखाटनांमधून प्रतीत होते. निष्पर्ण वृक्षांपासून फळा-फुलांनी डवरलेल्या वृक्षांना बघताना मन सस्मित होते. दीपमाळ, ज्ञानवृक्ष, काजवा वृक्ष, तारका वृक्ष, प्रकाशछाया वृक्ष अशी ६० रेखाटने पाहणाºयांना अचंबित करतात. या चित्रांच्या निरीक्षणातून अनेक कल्पना जन्म घेतात. रेषा, बिंदूंची रेखाटने बघताना चित्रकर्तीच्या अफाट श्रमाचे, कल्पनाशक्तीचे आश्चर्य वाटत राहते व निसर्गाकडे बघण्याची दृष्टी या चित्रांमध्ये आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. प्रदर्शन सोमवारी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत आहे.