दिंडोरी : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत केंद्र सरकार संजय गांधी योजनेमार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुख मृत झाल्यावर २० हजार रुपयाची मदत देण्यात येते. याअंर्तगत दिंडोरी तालुक्यातील २८ कुटुंबांना शासनाच्या वतीने ही मदत घरपोहोच देण्यात आली.
कोविड संसर्ग काळात लाभार्थी यांना तहसील कार्यालयात न बोलाविता तहसीलदार पंकज पवार, नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उमराळे बु. मंडळ अधिकारी, अव्वल कारकून भगवान काकड, तलाठी भोये यांनी उमराळे मंडळ भागात प्रत्यक्ष लाभार्थी यांच्या घरी जाऊन २० हजार रुपयांचे धनादेश वाटप केले. प्रथमच मदत घरपोच दिल्याने लाभार्थी कुटुंबांनी समाधान व्यक्त केले. याकामी महसूल सहायक दिनेश बोराडे यांनी काम पाहिले.राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत केंद्र सरकार संजय गांधी योजनेमार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुख मृत झालेल्यांच्या कुटुंबांना २० हजाराचा धनादेश देताना मंडळ अधिकारीभगवान काकड.