जानोरी ग्रामपालिकेचा अभिनव उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 06:11 PM2020-09-02T18:11:54+5:302020-09-02T18:12:29+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीने चार वर्षापासून एक चांगला उपक्र म राबवित आहे. गावातील सगळे लहान-मोठे गणपती बाण गंगा नदीत न बुडवता सर्व गणपतीची मूर्ती एकत्र करु न महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात. नदीपात्रामध्ये गणपती मुर्तींचे विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी हा उपक्र म चार वर्ष पासून जानोरी ग्रामपालिका करीत आहे. उपक्र माला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीने चार वर्षापासून एक चांगला उपक्र म राबवित आहे. गावातील सगळे लहान-मोठे गणपती बाण गंगा नदीत न बुडवता सर्व गणपतीची मूर्ती एकत्र करु न महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात. नदीपात्रामध्ये गणपती मुर्तींचे विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी हा उपक्र म चार वर्ष पासून जानोरी ग्रामपालिका करीत आहे. उपक्र माला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्र माला सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ, विष्णुपंत काठे, अशोक केंग, सुभाष नेहेरे, नामदेव डोंबाळे, दत्ता केंग, ग्रामस्थ भगीरथ घुमरे यांनी सहकार्य केले. (०२ जानोरी)
गणरायाचे विसर्जन घरगुती पध्दतीनेच...
खेडलेझुंगे : मागील दहा दिवांसापासुन लहान-थोरांच्या लाडक्या गणपती बाप्पाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर जड अंतकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. परिसरात कोरोनामुळे गणरायाचे आगमन ते विसर्जनापर्यंत नागॅ्नकांनी शांतता पाळण्यात आली. कोठेही ढोल ताशे, डिजे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वाद्यांचा वापर केल्याचे दिसुन आले नाही. परिसरात सार्वजनिक गणपती मंडळांनी गणपती बाप्पांचे घरीच स्थापना केलेली होती. यावर्षी घरगुती गणपती बाप्पाला मोठ्या आनंदाने साधेपणानेच निरोप देण्यात आला. परिसरामध्ये नागरिकांनी घरीच गणपती विसवर्जनाचा मार्ग आवलंबला. मोठे टप, मोठे पिंप, बादल्यांमध्ये गणरायाचे घरचेघरीच विसर्जण केले. यावेळी सर्वांना घरीच बाप्पाचे विसर्जन करतांना वेगळाच आनंद आनुभवयास मिळाला. (०२ खेडलेझुंगे)