महिला रुग्ण हेळसांड प्रकरणाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 01:17 AM2021-01-23T01:17:35+5:302021-01-23T01:18:55+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्याप्रकरणी आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून, तत्काळ चौकशी अहवाल सादर करुन या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.

Inquiry into female patient care case | महिला रुग्ण हेळसांड प्रकरणाची चौकशी

महिला रुग्ण हेळसांड प्रकरणाची चौकशी

Next
ठळक मुद्देबनसोड यांचे आदेश : दोषींवर कारवाई होणार

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्याप्रकरणी आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून, तत्काळ चौकशी अहवाल सादर करुन या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.  त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झालेल्या स्त्री रुग्णांना दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात हलविण्याच्या सूचनाही गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.     
कोरोनामुळे जिल्हयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर डिसेंबरपासून जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा नियमित स्वरूपाचा कार्यक्रम असून, एप्रिल ते मार्चपर्यंत नियमित स्वरुपात याची अंमलबजावणी करण्यात येते. शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पूर्वकल्पना दिली होती
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बेडच्या उपलब्धतेबाबत रुग्णांना पूर्वकल्पना दिली होती. मात्र, बेडअभावी काही स्त्री रुग्णांची गैरसोय झाल्याचे निर्दशनास आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्यामार्फत याबाबत चौकशीचे आदेश दिले असून, शुक्रवारी (दि.२२) सायंकाळपर्यंत चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.  

Web Title: Inquiry into female patient care case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.