शेतकरी आत्महत्या प्रकरणात असंवेदनशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 07:35 PM2018-01-09T19:35:16+5:302018-01-09T19:35:35+5:30

मालेगाव : शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून असंवेदनशीलता दाखविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Insensitivity in case of farmer suicides | शेतकरी आत्महत्या प्रकरणात असंवेदनशीलता

शेतकरी आत्महत्या प्रकरणात असंवेदनशीलता

Next

मालेगाव : शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून असंवेदनशीलता दाखविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील चौकटपाडे येथील दयावान मुरलीधर सरोदे (४५) या तरुण शेतकºयाने गेल्या २५ आॅगस्ट २०१७ रोजी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तालुका पोलीस निरीक्षक यांनी शेतकरी आत्महत्येच्या कारणाचा वेगवेगळा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केल्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकºयाचे कुटुंब मदतीपासून वंचित राहणार होते. जिल्हाधिकाºयांनी संवेदनशीलता दाखवित या प्रकरणाची चौकशी करून फेरअहवाल सादर करण्याच्या सूचना येथील तहसीलदार ज्योती देवरे यांना दिल्या आहेत. तब्बल सव्वादोन महिन्यांनी शेतकरी आत्महत्येचा अहवाल पाठविणाºया तलाठ्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
तालुक्यातील चौकटपाडे येथील दयावान सरोदे या तरुण शेतकºयाच्या नावावर ०.४७ आर क्षेत्र आहे. त्याने शेतीवर व हातउसने असे सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून सरोदे याने गेल्या २५ आॅगस्ट २०१७ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येच्या वेगवेगळ्या कारणांचा शोध घेण्यात आला. तलाठी देशमुख यांनी २५ नोव्हेंबर २०१७ ला (तब्बल सव्वादोन महिने) उशिराने शेतकरी आत्महत्येचा अहवाल येथील तहसील कार्यालयाकडे सादर केला. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेल्या शेतकरी आत्महत्येच्या अहवालात आत्महत्येच्या कारणांची तफावत आढळून आली. आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यास अडचण निर्माण झाली होती. जिल्हाधिकाºयांनी संवेदनशीलता दाखवित येथील तहसीलदार देवरे यांना या प्रकरणाची चौकशी करून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार देवरे यांनी ५ जानेवारीला चौकटपाडे येथे आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करीत माहिती घेतली. देवरे यांनी संबंधितांना मदत करण्यात तत्परता दाखविली आहे. सरोदे यांची आर्थिक परिस्थिती व बोंडअळीच्या आक्रमणामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. सरोदे यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा, दोन मुली, एक अपंग बहीण आहे. शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही तलाठ्यापासून वरिष्ठ अधिकारी असंवेदनशीलता दाखवित असतील तर मदतीची अपेक्षा कुणाकडून ठेवायची, असा सवाल उपस्थित झाला आहे. तालुक्यात गेल्या वर्षभरात १९ शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शासनाने शेतकºयांचे समुपदेशन करून त्यांची मानसिकता बदलण्यासाठी उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Insensitivity in case of farmer suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक