पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८४ वर सावळघाटात व कोटंबी घाटात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या गुणवत्ता व पर्यायी वाहतूक बाबत प्रवाशांकडून आलेल्या तक्रारी व लोकमत वृत्ताची दखल घेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन याबाबत सूचना दिल्या.पेठ ते नाशिकदरम्यान सावळघाटात सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वेळोवेळी तक्र ारी केल्या होत्या.याप्रसंगी सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, संचालक श्यामराव गावित, गटनेते भागवत पाटील, नगरसेवक संतोष डोमे, कांतिलाल राऊत, विक्रम चौधरी, करण करवंदे, गोरख रहाणे, मनोज गजभार आदी उपस्थित होते.---------------वारंवार वाहतूक कोंडीकाम सुरू असताना पर्यायी वाहतुकीबाबत संबंधित ठेकेदाराने कोणतेही नियोजन केले नसल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होऊन अवजड वाहनधारकांना समस्येचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन ठेकेदार व कामगारांना योग्य सूचना दिल्या.
सावळघाटातील रस्ता कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 8:42 PM